बीड :
परिवहन क्षेत्रात वाहनचालकांचे योगदान मोठे आहे. त्यांच्यामुळेच दळणवळण अधिक गतिमान व सोयीस्कर होते, असे प्रतिपादन महामार्ग विभागाचे सहायक निरीक्षक प्रवीणकुमार बांगर यांनी केले.
परिवहन आयुक्तांनी यंदा १७ सप्टेंबर हा चालक दिन म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले होते. यानिमित्ताने महामार्ग विभाग व मोटार मालक कामगार वाहतूक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने १७ सप्टेंबर रोजी पाडळसिंगी (ता. गेवराई) येथील टोलनाक्यावर वाहनचालकांचा सत्कार समारंभ पार पडला. यावेळी जिल्हा ट्रक चालक- मालक असोसिएशनचे अध्यक्ष विजय काकडे यांनीही मार्गदर्शन केले. वाहन चालकांचा सन्मान होणे ही समाधानाची बाब आहे. रस्ता सुरक्षा व अपघात टाळण्यात चालकांचे योगदान असते. त्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्याची परिवहन विभागाची संकल्पना कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. उपनिरीक्षक पल्लवी जाधव, तसेच महामार्ग विभागाचे अंमलदार व चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, मांजरसुंबा (ता. बीड) येथेही चालकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपनिरीक्षक सुरेश गित्ते, उपनिरीक्षक यशवंत घोडके यांची उपस्थिती होती. यावेळी चालकांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. अपघात टाळण्यासाठी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले.
170921\17bed_19_17092021_14.jpg
चालक दिन