शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
3
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
4
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
5
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
6
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
7
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
8
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
9
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
10
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
11
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
12
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
13
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
14
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
15
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
16
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
17
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
18
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
19
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
20
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!

बीडमध्ये पोलीस कुटुंबांसाठी साकारतेय सुविधायुक्त उद्यान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 12:22 AM

बीड : वॉकिंग ट्रॅक, बसण्याची सुविधा, खेळण्यासाठी मैदान, खेळणी, हिरवेगार लॉन आणि शोभेसाठीची परंतु सुगंधीत अशी रंगीबेरंगी फुलांची झाडे ...

ठळक मुद्देखेळणी, वॉकिंग ट्रॅकसह बसण्याची सुविधा; काम पूर्ण झाल्याची पोलीस अधीक्षकांची माहिती

बीड : वॉकिंग ट्रॅक, बसण्याची सुविधा, खेळण्यासाठी मैदान, खेळणी, हिरवेगार लॉन आणि शोभेसाठीची परंतु सुगंधीत अशी रंगीबेरंगी फुलांची झाडे असणारे सोयी सुविधायुक्त उद्यान पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या कर्मचा-यांच्या निवासस्थान परिसरात होत साकारत आहे. याचे काम पूर्ण झाले असून पुढील महिन्यात याचा लोकार्पन सोहळा पार पडणार आहे. पोलीस अधिकारी, कर्मचाºयांसह त्यांच्या पाल्यांना याचा लाभ होणार आहे.

हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. क्षेत्रीय कार्यालय सोलापूर यांच्या वतीने राज्यात तीन ठिकाणी पोलीस उद्यान विकास कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. यामध्ये सोलापूर, हिंगोली व बीडचा समावेश होता. पोलीस महासंचालकांच्या संकल्पनेतून हा उपक्रम हाती घेतला होता. बीडमध्ये २ जुलै रोजी पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांच्या हस्ते व अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या उपस्थितीत या उद्यानाचे भूमिपूजन झाले होते.

जनतेच्या सेवेसाठी रात्रंदिवस कार्यरत असणाºया पोलीस अधिकारी, कर्मचा-यांना व त्यांच्या पाल्यांसाठी बीडमध्ये सुविधायुक्त उद्यान नव्हते. त्यामुळे त्यांच्या खेळण्यासह इतर समस्यांना तोंड द्यावे लागत होते. परंतु अधीक्षक श्रीधर यांच्या पुढाकारातून बीडमध्ये हे उद्यान साकारण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला. त्याप्रमाणे याला मंजूरी मिळाली आणि कामाला सुरूवात झाली होती. किरकोळ कामे वगळता उद्यान उभारणी जवळपास पूर्ण झाली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या दुस-या आठवड्यात याचा लोकार्पण सोहळा पार पडणार असल्याचे श्रीधर यांनी सांगितले.वापरा आणि काळजी घ्याबीड शहरात पहिल्यांदाच अशाप्रकारे सर्व सोयीसुविधायुक्त उद्यान साकारत आहे. याचा वापर करण्याबरोबरच त्याचा सांभाळ करण्याची जबाबदारीही पोलीस अधिकारी, कर्मचाºयांची आहे. आपले उद्याने आहे, असे समजून वापर केला तर याची शोभा टिकून राहिल, असेही अधीक्षक जी.श्रीधर म्हणाले.

उद्यानात असतील या सुविधा६० बाय ५० मिटरमध्ये साकारत असलेल्या या उद्यानात गार्डन, ट्रॅक, खेळणी, मैदान, बाकडे, पथदिवे, फुलांची झाडे, कंपाऊंड वॉल, सुरक्षा रक्षक, पिण्याचे पाणी आदी सुविधा असणार आहेत.पोलीस अधिकारी, कर्मचाºयांसह त्यांच्या पाल्यांना याचा लाभ घेता येईल. उद्यानाचे काम अंतिम टप्प्यात आहे. पोलीस महासंचालक यांचा वेळ मिळताच पुढील महिन्यात याचा लोकार्पण सोहळा होईल.- जी.श्रीधरपोलीस अधीक्षक, बीड