---------
लॉकडाऊनमुळे भाजीविक्रेत्यांचे हाल
बीड : जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने नियंत्रणासाठी २५ मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला. केवळ दूधविक्रीला काही तासांसाठी मुभा होती. त्यामुळे दुकाने, व्यवसाय बंद होते. बीड, धारूर, गेवराई, माजलगावात दुकाने उघडी ठेवणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. मात्र भाजी विक्रेत्यांना त्यांच्याकडील भाजीपाला विकता न आल्याने रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आली.
------------
स्वच्छतेची मागणी
बीड : शहरात कोराेना काळात गतवर्षी सोडियम हायपोक्लोराइडची फवारणी तसेच स्वच्छतेची कामे करण्यात आली होती. यावर्षी मात्र तशी माेहीम थंडावली आहे. नगर परिषदेकडून नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचा सपाटा लावला असला तरी नागरी सुविधांच्या दृष्टीने स्वच्छतेच्या कामांकडे दुर्लक्ष होत आहे. नागरिकांतून स्वच्छतेची मागणी होत आहे.
-------
मास्क वापराकडे दुर्लक्ष
बीड : कोरोनाचा संसर्ग वाढत असताना मास्क वापराचे आवाहन प्रशासनाकडून वारंवार केले जाते. मात्र औषध दुकानांमध्ये खरेदी करणारे बहुतांश ग्राहक विनामास्क वावरताना दिसत आहेत. विक्रेत्यांनी समजावून सांगितले तरी दुर्लक्ष केले जाते. विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे.