- मधुकर सिरसटकेज : तालुक्यातील मस्साजोग शिवारातील अवादा एनर्जी कंपनीच्या गोदामतून 11 लाख 26 हजार रुपयाच्या कॉपरच्या केबलची चोरी झाली आसून सहाय्यक स्टोअर मॅनेजर आशुतोष जयराम सिंग यांच्या फिर्यादी वरून मंगळवारी अज्ञात चोरट्या विरुद्ध केज पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.
केज तालुक्यातील पवनचक्क्या उभारणीचे काम करणाऱ्या अवादा ऍनर्जी कंपनीच्या मस्साजोग शिवारातील गोदामतून सोमवारी ( दि. 10 ) च्या रात्री साडे सहा ते मध्यरात्री 12 वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्यानी 11 लाख 26 हजार रुपये किमतीचे कॉपरचे केबल चोरून नेल्याची घटना घडली आसून अवादा ऍनर्जी कंपनीचे सहाय्यक स्टोअर मॅनेजर आशुतोश जयराम सिंग यांच्या फिर्यादीवरून मंगळवारी ( दि. 18 ) रात्री 11 वाजता अज्ञात चोरट्या विरुद्ध केज पोलिसात गुन्हा नोंद झाला आसून पुढील तपास पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राकेश बनसोडे हे करीत आहेत.
सीसीटीव्ही फुटेज मिळेना..या प्रकरणी तपास अधिकारी पोलीस उप निरीक्षक राकेश बनसोडे यांनी अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे सीसीटीव्हीच्या फुटेजची मागणी केली आसता, सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नसल्याची माहिती फिर्यादी आशुतोष सिंग यांनी तपास अधिकारी व लोकमतशी बोलताना दिली.