बीड : जिल्ह्यात मागील दीड वर्षापासून कोरोनाने थैमान घातले आहे. यात पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट बीड जिल्ह्यासाठी खूपच भयानक ठरली आहे. दुसऱ्या लाटेतील सहा महिन्यांत तब्बल ८१ हजार नवे रुग्ण आढळले आहेत, तर दोन हजार रुग्णांचा कोरोनाने जीव घेतला आहे. आता एकूण बाधितांची संख्या १ लाख ८ एवढी झाली आहे. एकूण लोकसंख्येच्या तुलनेत आणि इतर जिल्ह्यांच्या तुलनेत हा आकडा अतिशय चिंताजनक आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाचे सर्व नियम पाळण्यासह काळजी घेण्याची गरज आहे.
---
रुग्णसंख्येच्या शतकाने बीड 'लाख'पार
जिल्ह्यात कोरोना संशयित असलेल्या ५ हजार ८३० लोकांची चाचणी करण्यात आली. यात १०० रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. यामुळे एकूण बाधितांची संख्या एक लाखाच्या पार गेली. नव्या रुग्णांमध्ये अंबाजोगाईत ८, आष्टीत २२, बीड २५, धारुर ७, गेवराई ५, केज ८, माजलगाव ४, पाटोदा ११, शिरुर ४, तर वडवणी येथील ६ रुग्णांचा समावेश आहे. तसेच शिरुर तालुक्यातील आर्वी येथील ७० वर्षीय पुरुष आणि बीड तालुक्यातील आहेर चिंचाेली येथील ८५ वर्षीय महिला या दोन कोरोना बळींची नोंद आरोग्य विभागाकडे झाली.
----
पहिली लाट (७ एप्रिल २०२० ते २८ फेब्रुवारी २०२१)
रुग्णसंख्या १८७०४
कोरोनामुक्त १७८४५
कोरोना बळी ५७७
----
दुसरी लाट (०१ मार्च २०२१ ते आजपर्यंत)
रुग्णसंख्या ८१३०४
कोरोनामुक्त ७७६३५
कोरोनाबळी २१०६
===
आतापर्यंतच्या चाचण्या...
आरटीपीसीआर २९६८६७
अँटिजन ४५५२२०
---
पहिला कोरोनाबाधित रुग्ण - ८ एप्रिल २०२०
पहिला रुग्ण कोरोनामुक्त - २२ एप्रिल २०२०
पहिला मृत्यू - १७ मे
---
२९ एप्रिल २०२१ रोजी एकाच दिवशी सर्वाधिक १५६९ रुग्णसंख्या नोंद
२ मे २०२१ रोजी एकाच दिवशीचा पॉझिटिव्हिटी रेट ३४.६६
---
आतापर्यंतची एकूण आकडेवारी...
एकूण कोरोनाबाधित १००००८
एकूण कोरोनामुक्त ९५४८०
एकूण कोरोना बळी २६८३
सध्या उपचार सुरू - १८३९
---
कॉन्टॅक्ट ट्रेसिंग
एकूण - १९६६२०९
हाय रिस्क - ४८५५१४
लो रिस्क - १५०२६२९
लक्षणे असलेले - ७४००१
---
जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट ११.६७ टक्के
जिल्ह्याचा डेथ रेट २.६८ टक्के
जिल्ह्याचा रिकव्हरी रेट ९५.४३ टक्के
---
सध्या उपचारासाठीची यंत्रणा व खाटा...
खासगी व सरकारी आरोग्य संस्था ९९
एकूण खाटा ५१३८
रिकाम्या खाटा ४०९४