शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
4
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
6
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
7
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
8
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
9
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
10
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
11
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
12
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
13
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
14
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
15
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
16
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
18
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
20
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक

बीड जिल्ह्यात कोरोनामुळे उद्योगांची क्षमता घसरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 4:33 AM

बीड : जिल्ह्यात कृषी आधारित असलेले उद्योग ऑइल मिल आणि जिनिंग सुरू आहेत, तर फॅब्रिकेशन, स्टील फर्निचर, केमिकल पॅकिंग ...

बीड : जिल्ह्यात कृषी आधारित असलेले उद्योग ऑइल मिल आणि जिनिंग सुरू आहेत, तर फॅब्रिकेशन, स्टील फर्निचर, केमिकल पॅकिंग युनिट, टेक्सटाइल उद्योग मात्र सध्या लॉकडाऊनमुळे बंद आहे. जिल्ह्यात ऑइल मिलचे दीडशे युनिट असून, ७० ते ८० जिनिंग आहेत. हंगाम संपत आल्याने बहुतांशी प्रक्रिया उद्योग सध्या बंद झाले आहेत. दुसरीकडे यंदाच्या लॉकडाऊनमध्ये सरकारकडून मुभा मिळाल्याने उद्योग व्यवसाय सुरू आहेत. मात्र, त्यांची क्षमता घटली असून, निर्मितीवर परिणाम झाला. बहुतांश उद्योगात पशुखाद्य निर्मिती आणि खाद्यतेलाची निर्मिती केली जाते. शेतकऱ्यांच्या दृष्टीने व बाजाराच्या दृष्टीने हे उद्योग सरू असल्याने, तीन ते चार हजार लोकांना रोजगार उपलब्ध झालेला आहे. लॉकडाऊन असतानाही शासनाच्या सवलतींमुळे या उद्योगातील कामगारांना कसलीही आर्थिक अडचण अद्याप जाणवलेली दिसत नाही.

वाहतूक सुविधेच्या अडचणी

१) बंद असलेल्या उद्योगांपुढे गुंतवणुकीवरील व्याजाचा भार, उभारणी करताना व उद्योग चालविताना केलेली गुंतवणूक, यामुळे आर्थिक संकट घोंगावत आहे, तर सुरू असलेले उद्योग पूर्ण क्षमतेने सध्या सुरू नाहीत. उत्पादन केले, तर ते विकेल काय, त्याला बाजारपेठ मिळू शकेल काय, हा प्रश्न आहे.

२) वाहतूक सुविधा कमी पडते. कच्चामाल आणावयाचा असल्यास किंवा उत्पादनाचा पुरवठा करावयाचा असल्यास थेट वाहन सुविधा यांची सोय नसल्याने अडचणी आहेत.

३) ऑक्सिजन गॅस सिलिंडरचा वापर करावा लागणारे सर्व उद्योग शासन निर्देशानुसार बंद आहेत. स्टील फॅब्रिकेशन कारखान्यात आर्थिक भार सहन करीत आहेत.

४) मागील काही दिवसांपासून आडत बाजार बंद आहे. बंदमुळे सुरू असणाऱ्या प्रक्रिया उद्याेगांना कच्चामाल खरेदी करणे अवघड झाले आहे.

५) नवीन उद्योगांना वीज जोडणी मिळण्यास होणारा विलंब, तसेच मनुष्यबळाचा अभाव हेही एक कारण मंदावलेल्या उद्योग स्थितीवर अधोरेखित करणारे आहे.

------

सरकारने पाठबळ द्यावे

कारखानदारांना आर्थिक पाठबळाची गरज आहे. कर्जावरील व्याजात ५० टक्के वाटा सरकारने उचलून उद्योजकांवर भार कमी करण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर, वीजबिलात स्थिर अधिकारासह ५० टक्के सूट शासनाने द्यायला हवी.

गोपाल कासट, अध्यक्ष, बीड जिल्हा जिनिंग-प्रेसिंग संघटना.

-----

६० टक्के उत्पादन घटले

कारखान्यांमध्ये उत्पादन ६० टक्के घटलेले आहे. डाळीचे ग्राहक नसल्याने उठाव नाही, त्यामुळे स्टॉक करावा लागत आहे. मोठी गुंतवणूक केली आहे. उद्योगांच्या चालू खात्यावरील व्याज कमी करण्याची आवश्यकता आहे. उद्योग पूर्ण क्षमतेने सध्या सुरू नाहीत. त्यामुळे आहे तो स्टाफ सांभाळण्याची कसरत करावी लागत आहे.

- लक्ष्मीनारायण मुंदडा, माजलगाव.

------

या उद्योगांनाही कोविड कर्ज लोन मिळावे

माझा बॅन्डेज निर्मितीचा उद्योग आहे. कोरोनामुळे उत्पादन कमी असले, तरी स्टॉकमुळे गुंतवणूक वाढली आहे. शासनाकडून पुरवठ्याची बिले वेळेवर मिळत नाहीत. सहकारी बँकेत खाते असणाऱ्या उद्योगांनाही कोविड लोनची व्यवस्था करण्याची गरज आहे.

- अमोल विप्र, उद्योजक, बीड.

-------

उद्योग व रोजगार वाचवा

कोरोना लॉकडाऊनमुळे उद्योग ८० टक्के कोलमडले आहेत. आतापर्यंत शासनाने कुठल्याही आपत्ती व संकटाच्या वेळी उद्योगांना थेट मदत केलेली नाही. या उद्योगांवरच कामगारांचे जीवन अवलंबून आहे. त्यांच्या रोजगाराचाही विचार व्हावा. उद्योग सावरण्यासाठी शासनाने आर्थिक पॅकेज देण्याची गरज आहे.

- भगिरथ बियाणी, उद्योजक

---------

मी उद्योगाच्या ठिकाणी वाहतूक हमालीचे काम करतो. आधी दिवसाला ७०० रुपयांपर्यंत मजुरी मिळत होती. आता दोन-दोन दिवस काम मिळत नाही. मिळाले, तरी ते तोकडेच असते.

-- अशोक निसर्गन, कामगार.

---------

ऑइल मिलमध्ये सहा एक्सिपलरचे काम असले, तर आम्ही पती-पत्नीला ८०० रुपये रोज मिळतो, परंतु सध्या काम कमी असल्याने दिवसाला केवळ २०० रुपयेच मिळतात.

- माउली इंगळे.

--------

२२० उद्योग बंदच

बीड ३००

आष्टी ४०

माजलगाव ६०

धारूर २० असे

हे लहान-मोठे उद्योग औद्योगिक वसाहत, तसेच लगतच्या परिसरांमध्ये उभे आहेत.

या उद्योगांपैकी पन्नास टक्के म्हणजे २२० उद्योग बंद आहेत.

---------