आलेल्या अहवालात कोरोनाने शंभरी पूर्ण केली असून १२७ व्यक्ती पॉझिटिव्ह आलेल्या आहेत. तरीही काही जबाबदार नागरिक विनाकारण रस्त्यावर बेजबाबदारपणे फिरत असल्याचे दिसून येत आहे. नागरिकांनो बेजबाबदारपणे वागू नका ! प्रशासनाच्या नियमांचे पालन करा असे म्हणण्याची वेळ आली आहे.
जिल्ह्यात एप्रिल २०२० मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आष्टी तालुक्यातील पिंपळा येथे आढळून आल्यानंतर संपूर्ण जिल्हावासी भयभीत झाले होते. कोरोनाला रोखण्यासाठी आरोग्य, महसूल, पोलीस प्रशासन मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत आहेत.
तरीही काही व्यक्ती प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करत आहेत. विनामास्क बाहेर फिरणे, सामाजिक अंतराचे पालन न करणे, एकाच जागेवर गर्दी करणे असे प्रकार आष्टीसह तालुक्यातील अनेक गावात पाहायला मिळत आहे. तालुक्यात कोरोनाचे रुग्ण कमी होते परंतु आता हाच आकडा एक वरून एकशे दोन झाला आहे. आष्टीचे तहसीलदार राजाभाऊ कदम,पोलीस उपविभागीय अधिकारी विजय लगारे,ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. राहुल टेकाडे,पोलीस निरीक्षक सलीम चाऊस, नगर पंचायतचे मुख्याधिकारी नीता अंधारे,सहायक पोलीस निरीक्षक भरत मोरे, सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे यांच्यासह अनेक राजकीय, सामाजिक कार्यकर्ते आदींनी नागरिकांच्या भल्यासाठी रस्त्यावर उतरून आवाहन केले.
तरीही काही नागरिक बेजबाबदारपणे वागताना दिसत आहेत.