शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

बीड जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयांतील कोरोना डेथ ऑडिट सुरु 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2020 7:26 PM

बीड शहरातील ‘लोटस’सह सात रुग्णालयांचा समावेश, समितीकडून चौकशी सुरू

ठळक मुद्देबिलांचेही ऑडिट व्हावे

बीड : बीड शहरातील लोटससह इतर सात रुग्णालयांत कोरोनामुळे रुग्णांचे मृत्यू झाले होते. पैसे खर्चूनही रुग्णांचा जीव जात असल्याने संताप व्यक्त होत होता. हाच धागा पकडून ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते. यावर आरोग्य विभागाने खाजगी रुग्णालयांतील डेथ ऑडिट सुरू केले आहे. यामुळे डॉक्टरांचे धाबे दणाणले आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत १४ हजार कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या कमी होत आहे; परंतु मागील तीन महिन्यांपूर्वी बाधितांची संख्या झपाट्याने वाढत होती. त्यामुळे खाजगी रुग्णालये अधिगृहित केली होती. त्यांना कोविड सेंटर घोषित केले होते. यात सर्वात अगाेदर लोटस हॉस्पिटल अधिगृहित केले. त्यामुळे येथे रुग्ण दाखल होणाऱ्यांची संख्या वाढली होती. याच लोटस रुग्णालयात आतापर्यंत तब्बल ९ जणांचा बळी गेला आहे. 

बिलांचेही ऑडिट व्हावेडेथ ऑडिटप्रमाणेच रुग्णांकडून आकारलेल्या  बिलांचेही ऑडिट करण्याची गरज आहे. १० दिवस रुग्णालयात ठेवून अवास्तव  बिले घेतल्याच्या अनेक तक्रारी आहेत. आरोग्य विभागाने याचीही माहिती घेऊन ऑडिट करावे, अशी मागणी सामान्यांमधून होत आहे. 

कागदपत्रांसह माहिती संकलितखाजगी रुग्णालयातील मृत्यूचा वाढता आकडा पाहून ‘लोकमत’ने सोमवारी वृत्त प्रकाशित केले होते. यावर आरोग्य विभागाने खाजगी रुग्णालयांतील डेथ ऑडिट करण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी समितीने सर्व कागदपत्रे आणि आवश्यक माहिती संकलित केल्याचे सांगण्यात आले. डेथ ऑडिट होणार असल्याने या रुग्णालय चालकांचे धाबे दणाणले आहे.

खाजगी रुग्णालयांतील डेथ ऑडिट करण्यास सुरुवात झाली आहे. सर्व कागदपत्रे आणि माहिती घेतली आहे. यावर समितीकडून अहवाल तयार होईल. दोन दिवसांत यावर निर्णय घेतला जाईल. त्यानंतरच कोणी दोषी आहे की नाही, हे समजेल. - डॉ. अशोक थोरात, जिल्हा शल्यचिकित्सक, बीड

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBeedबीडDeathमृत्यू