अंबाजोगाई :कोरोना रोखण्यासाठी व रोग प्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी गुळवेल (अमृतवेल) या वनस्पतीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गुळवेलचा काढा घेण्याकडेही कल वाढला आहे.
अंबाजोगाई तालुक्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे.शहरी भागासह ग्रामीण भागात ही रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.कोरोनाच्या काळात रोग प्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी गुळवेल या वनस्पतीचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. गुळवेल ही वनस्पती रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करते. त्यामुळे या वनस्पतीची मागणी चांगलीच वाढली आहे.कोरोना संसर्ग टाळण्यासाठी अनेक कुटुंबांनी गुळवेलचा काढा घेण्याला पसंदी दिली आहे. अनेक आजारांवर ही वेल अमृतवेल ठरत असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.
गुळवेलचा काढा सेवन केल्याने ताप, सर्दी,खोकला,डोकेदुखी, मळमळ,मुळव्याध, सांधेदुखी, आम्लपित्त, पोटदुखी,मधुमेह आदी आजार गुळवेलमुळे आटोक्यात येतात, असे सांगितले जाते. तसेच डेंग्यू, चिकुनगुन्या, स्वाईन फ्ल्यू या आजारांवर ही गुळवेल गुणकारी असल्यामुळे शहरातील व ग्रामीण भागातील असंख्य कुटुंबातून त्याची मागणी होत आहे.
ग्रामीण भागात कडुनिंबाच्या झाडावर व आंब्याच्या झाडावर गुळवेल ही वनस्पती मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसून येते. कडुनिंबाच्या झाडावरील गुळवेलला मोठी मागणी आहे. कोरोनाचा संसर्ग वाढल्यापासून अनेक कुटुंब गुळवेल काढा सेवन करीत आहेत. काहीजण या वेलीचे छोटे छोटे तुकडे करून रात्री पाण्यात भिजत ठेवतात. सकाळी उपाशीपोटी या पाण्याचे सेवन करतात. तर काहीजण या वेलीचे तुकडे पाण्यात टाकून ते पाणी उकळून पितात. गुळवेल हा एक रानभाजीचा प्रकारही मानला जातो.
गुळवेलचे अनेक फायदे आहेत. प्रतिकारशक्ती वाढते. रक्तदाब कमी होतो. मलेरिया,टायफाईड आजारावर फायदेशीर आहे. पोटाच्या समस्या दूर होतात. - ह.भ. प.अंबादास महाराज चिक्षे,अंबाजोगाई.
गुळवेलमुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते. गुळवेल सर्दी,खोकला,दमा कमी करतो.रक्तातील पांढऱ्यापेशी वाढण्यास मदत होते. मधुमेह(रक्तातील साखर)कमी करण्यास फायदेशीर आहे.ते घेण्याचे प्रमाण ठरलेले असते. आजार असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घ्यावेत. - डॉ. विशाल कुलकर्णी (कुंभारीकर) आयुर्वेद तज्ज्ञ.
===Photopath===
110521\fb_img_1619800805753_14.jpg~110521\fb_img_1619800801305_14.jpg