बीड : जिल्ह्यातील माजलगाव व गेवराई तालुक्यातील सात वाळू घाटांचा लिलाव झालेला आहे. त्या ठिकाणावरून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा व वाहतूक केली जाते. मात्र, मोठी गर्दी होत असल्यामुळे कोरोना संसर्ग त्यांच्यापासून वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात होती. यासंदर्भात जिल्हाधिकारी यांना सर्व घाटांवरील कामगारांची कोरोना तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.
जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन, पांचाळेश्वर, सुळेगाव, नागझरी व माजलगाव तालुक्यातील आडोळा व गव्हाणथडी या वाळू घाटांचा लिलाव करण्यात आला होता. त्या ठिकाणावरून रोज मोठ्या प्रमाणात वाळू उपसा व वाहतूक केली जाते. दरम्यान, या ठिकाणी वाळू उपसा करण्यासाठी व वाहतुकीसाठी असलेल्या कामगारांची संख्यादेखील मोठी आहे. जिल्ह्यातील विविध गावांमध्ये या ठिकाणावरून वाळू पुरवठा केला जातो. या कामगारांच्या व वाहनचालकांच्या माध्यमातून कोरोना संसर्ग होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे वाळू घाटांवर उपसा करणाऱ्या कामगारांना तसेच वाहतुकीसाठी जाणाऱ्या वाहन चालाकांना कोरोना तपासणी करणे बंधनकारक केले आहे. कोरोना तपासणी केल्यानंतर निगेटिव्ह प्रमाणपत्र असेल तरच वाळू घाटवर प्रवेश मिळणार आहे. या प्रमाणपत्राची वैधता सात दिवस असणार आहे. कामगारांची कोरोना तपासणी करण्याची जबाबदार संबंधित वाळू घाटाच्या कंत्राटदाराची असणार आहे. त्यांनी वाळू घाटावरील सर्व कामगारांची कोरोना तपासणी तत्काळ करून घ्यावी तसेच वाळू घाटावर असलेल्या कामगाराकडे जर कोरोना तपासणी केलेले प्रमाणपत्र नसेल तर संबंधित वाळू घाटाच्या कंत्राटदारांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारादेखील जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी दिला आहे.
कामगारांनी नियमांचे पालन करावे
वाळू घाटावर काम करणाऱ्या कामगारांनी तसेच वाहन चालकांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतराचे पालन करणे, कंत्राटदारांनी सॅनिटाझरची व्यवस्था घाटावर करावी. सर्व नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे.
तर...तहसीलदरांवर होणार कारवाई
वाळू घाटावरील उपस्थित मजूर, वाहन चालक लिलावधारक व त्यांचे नियुक्त कर्मचारी यांची कोरोना चाचणी करण्यात आल्यानंतर त्याचे निगेटिव्ह प्रमाणपत्र असलेले कामगार व इतर लोकघाटावर आहेत का, याची तपासणी वेळोवेळी खात्री करून, त्याचा अहवाल वरिष्ठ कार्यालयास पाठावावा. नियमांचा भंग झाल्याचे निदर्शनास आले तर संबंधित तहसीलदारांवर कारवाई करण्यात येणार आहे, असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.
===Photopath===
290421\29_2_bed_11_29042021_14.jpg
===Caption===
वाळू घाटावरील कामगार