नेकनूर येथील संतोष गायकवाड हे गेवराई आगारात मागील काही वर्षापासून कर्तव्यास होते. पाच दिवसांपूर्वी कर्तव्य बजावत असताना त्यांना कोरोनाची लक्षणे जाणवू लागली. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केले. प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना औरंगाबाद येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र बुधवारी रात्री उपचारादरम्यान गायकवाड यांचा मृत्यू झाला.
या मृत्यूने आगारातील असुविधेाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. कोरोना काळात देखील बससेवा चालू असून येथील काही कर्मचाऱ्यांना बेस्ट सेवेसाठी गेल्या सहा महिन्यांपासून बळजबरी पाठवले जातेय. गायकवाड यांना देखील बेस्ट सेवेसाठी पाठवण्यात आले होते, यामुळेच त्यांना कोरोनाची बाधा झाली. दरम्यान कर्मचाऱ्यांना आजारपणाची, कौटुंबिक कसलीच समस्या जाणून न घेता पाठवण्यात येत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.
गेवराई आगारातील गायकवाड हे पहिले कोरोना बळी ठरले. दरम्यान बाधित कामगारांबद्दल कसलीही सहानुभुती न दाखवता काम करुन घेतले जात असल्याचा आरोप येथील कर्मचाऱ्यांमधून होत आहे. रापम कर्मचाऱ्यांना मास्क, सैनिटायजर, वैक्सिन यासांरख्या मुलभुत सुविधा तरी पुरवा अशी मागणी होत आहे.
===Photopath===
150421\15_2_bed_22_15042021_14.jpeg
===Caption===
संतोष गायकवाड