शिरूर कासार : तालुक्यात कोरोनाचा वाढता उद्रेक लक्षात घेता नगरपंचायतीने विविध उपायांबरोबरच कठोर अंमलबजावणी सुरू केली आहे. मंगळवारी विनामास्क संचार करणारे १५ तसेच नियम मोडणाऱ्या चार ४ दुकानदारांकडून ६ हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला. जानेवारीपासून आतापर्यंत साडेतीन महिन्यांत १ लाख ९८ हजार २०० रुपये इतका दंड वसूल केला आहे. यात प्रामुख्याने मास्क न वापरणारे ४२२ व नियमावलीचा भंग करणाऱ्या ३७ दुकानदारांचा समावेश आहे. विनामास्कबद्दल १ लाख ५३ हजार २०० तर दुकानदारांकडून ४५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून वारंवार आवाहन करूनही नियमांची पायमल्ली करणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाईचा धडाका सुरू करण्यात आला. मुख्याधिकारी आपले कर्मचारी सोबत घेऊन रस्त्यावर फिरून ही कारवाई करत आहेत.
मास्कचा वापर अनिवार्य सार्वजनिक ठिकाणी फिरताना तसेच वाहनातून प्रवास करताना मास्क बंधनकारक आहे.
सामाजिक अंतर राखणे, दोन व्यक्तींमध्ये किमान सहा फूट अंतर सुरक्षेच्या दृष्टीने बंधनकारक असून दुकानात गर्दी होऊ न देण्याची जबाबदारी दुकानदारांची आहे. सार्वजनिक जागी थुंकण्यास प्रतिबंध असून तोही दंडनीय ठरतो. शासन नियमांचे पालन करून नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी किशोर सानप यांनी केले आहे.
===Photopath===
200421\vijaykumar gadekar_img-20210420-wa0024_14.jpg