२२ ऑगस्ट रोजी ४ हजार ११९ संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. यापैकी ४ हजार ४८ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला, तर ७४ जण बाधित आढळून आले.
नव्या रुग्णांमध्ये अंबाजोगाई तालुक्यात ६, आष्टी तालुक्यात ८, धारुरमध्ये २, गेवराईत २, केजमध्ये १०, माजलगावात २, परळीत १, पाटोद्यात ६, शिरुरमध्ये ४, वडवणीत ६, तर बीड शहर व तालुक्यात २४ रुग्ण आढळून आले. दिवसभरात १४७ जणांनी कोरोनावर मात केली. त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
दरम्यान, रविवारी ३ मृत्यूची नोंद आरोग्य विभागाच्या आयसीएमआर पोर्टलवर झाली. यामध्ये केज तालुक्यातील जाधवजवळा येथील ६० वर्षीय पुरुष, आष्टी तालुक्यातील हातोला येथील ७० वर्षीय महिला आणि गेवराई तालुक्यातील चोपड्याचीवाडी येथील ७६ वर्षीय महिलेचा समावेश आहे. एकूण बाधितांची संख्या १ लाख ४३० इतकी झाली असून, कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ९६ हजार ५३४ इतकी झाली आहे. आतापर्यंत २ हजार ६९३ जणांचा बळी गेला असून, सध्या १ हजार २०३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.