जिल्ह्यात सोमवारी २ हजार २७३ संशयितांची तपासणी करण्यात आली. त्याचे अहवाल मंगळवारी मिळाले. यात २ हजार २३२ निगेटिव्ह, तर ४१ अहवाल पॉझिटिव्ह आले. बाधितांमध्ये अंबाजोगाई तालुक्यात ४, आष्टी ३, बीड ९, गेवराई ५, केज १४, पाटोदा ४ आणि शिरुर व वडवणी तालुक्यातील प्रत्येकी १ रुग्णाचा समावेश आहे. दिवसभरात ४१ रुग्णांनी कोरोनावर मात केली, शिवाय गत चोवीस तासांत तीन रुग्णांच्या मृत्यूची नोंद आरोग्य विभागाकडे झाली. आता जिल्ह्यातील बाधितांचा एकूण आकडा १ लाख २ हजार ४१९ इतका झाला आहे, तर कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ९९ हजार १३७ इतकी झाली आहे. आतापर्यंंत २ हजार ७४८ जणांचा बळी गेला आहे. सध्या ५३४ रुग्ण उपचाराखाली आहेत.
कोरोनाने घेतला आणखी तिघांचा जीव; ४१ नवे रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 4:37 AM