गंगामसला : माजलगाव तालुक्यातील खरात आडगाव येथील उपकेंद्रात बुधवारी कोरोना लसीकरण मोहीम राबविण्यात आली. या लसीकरण मोहिमेचे उद्घाटन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भारतराव शेजुळ यांच्या हस्ते करण्यात आले. या साथ रोगावर लसीकरण करून उपाययोजना करण्यात येत आहेत. याचाच भाग म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र, गंगामसला अंतर्गत येणाऱ्या खरात आडगाव उपकेंद्रात लसीकरण मोहीम राबविण्यात आली.
यावेळी सरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते. या लसीकरण मोहिमेंतर्गत गावातील १२० जणांनी लस टोचून घेत चांगला प्रतिसाद दिला. लसीकरण पथकाने लसीकरणाची माहिती देऊन ग्रामस्थांमध्ये असलेले गैरसमज दूर करून लसीकरणाविषयी जनजागृती केली. ही लसीकरण माेहीम यशस्वी होण्यासाठी घेवरे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे पर्यवेक्षक विजयकुमार दळवी, पुष्पा आत्राम, शिवकन्या शिंदे, नंदा कबले, रत्नमाला मर्कांड, विशाल सोळंके, प्रशांत जगनाडे, आशा शिवशाला रासवे व रेखा वाघमारे यांनी परिश्रम घेतले.
===Photopath===
310321\save_20210331_164027_14.jpg