आष्टी : देशात आजपासून कोरोना लसीकरण मोहिमेला सुरूवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांना लस देण्यात येत आहे. आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात आ. सुरेश धस, आ. बाळासाहेब आजबे, सतिश शिंदे, तहसिलदार शारदा दळवी, गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे यांच्या उपस्थितीत लसीकरण मोहीम सकाळी ११ वाजता सुरु करण्यात आली.
कोरोना विषाणूपासून संरक्षण मिळवण्यासाठी संपूर्ण देशात लसीकरण मोहिमेला आज शनिवार दि.१६ जानेवारी रोजी सुरुवात झाली आहे. तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय येथील सर्व आरोग्य अधिकारी, डाॅक्टर, नर्स व कर्मचाऱ्यांना लस देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. आज दिवसभरात आरोग्य विभागातील एकूण १०० कोरोना योद्ध्यांना लस देण्यात येणार आहे. या मोहिमेत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राहूल टेकाडे, डाॅ.रामदास मोराळे, डॉ प्रदीप अकोलकर, डाॅ.जावळे,डाॅ.निखिल गायकवाड,डाॅ.अमित डोके,डाॅ.शिवराज नवले,डाॅ.रुपाली राऊत,नागेश करांडे,संदिप धस व आदी कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे.