आरोग्य विभाग : लस उपलब्ध होताच मेसेज, कॉलद्वारे बाेलावणार केंद्रावर
बीड : कोरोना लसीचा तुटवडा असला तरी लस आल्यावर गोंधळ उडू नये, यासाठी बीड आरोग्य विभागाने नियोजन केले आहे. एक वेब लिंक व ॲप तयार करून घरबसल्या ऑनलाईन अपॉईंटमेंट घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी लस येण्याची प्रतीक्षा कायम आहे.
जिल्ह्यात सध्या कोरोना लसीचा पुरवठा बंद आहे. केवळ दुसरा डोस असणाऱ्या लोकांना लस दिली जात आहे. आतापर्यंत जिल्ह्यात २ लाख लोकांना लस दिली असली तरी अद्यापही लाखो लोक यापासून वंचित आहेत. शासनाकडून लसीचा मुबलक पुरवठा होत नसल्याने नागरिकांना प्रतीक्षा करावी लागत आहे. असे असले तरी काही दिवसांनी लसीचा पुरवठा होणार आहे. यावेळी नागरिकांची गर्दी होऊ नये, यासाठी आराेग्य विभागाने एक वेबलिंक तयार करून घरबसल्या ऑनलाईन अपॉईंटमेंट घेण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. यात वेळ, टोकन क्रमांक आणि लसीकरण केंद्राची माहिती मिळणार आहे. जिल्हाधिकारी रवींद्र जगताप, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांनी याचे नियोजन केले आहे.
अशी मिळवा ऑनलाईन अपॉईंटमेंट
सुरूवातीला गुगलवर जावून https://ezeeforms.com/Static/DynamicPage.aspx?Id=4B2B080E ही लिंक ओपन करा. त्यानंतर आपले पूर्ण नाव व वय टाकावे. नंतर १० आकडी मोबाईल क्रमांक टाकावा. आपण स्त्री आहेत की पुरूष यावर क्लिक करून पुढे आपला नोंदणीकृत पत्ता टाकावा. नंतर आपल्याला लसीकरण केंद्रांची यादी येईल. त्यातून आवडीचे केंद्र निवडावे. आपण पहिला की दुसरा डोस घेणार आहेत, यावर क्लिक करावे. नंतर एक कोड समोर दिसेल, तोच खालील बॉक्समध्ये टाकावा. शेवटी पुन्हा मोबाईल क्रमांक टाकून सबमीट करावे. नंतर 'डाटा सबमिटेड सक्सेसफुली' असे समेार दिसेल. त्याचा स्क्रीनशॉट अथवा फोटो काढून जपून ठेवावा. यात टोकन क्रमांक आणि लसीकरण केंद्राचे नाव असेल. तसेच नीडली ॲप डाऊनलोड केले असल्यास लसीचे स्टेटस समजणार आहे. लस उपलब्ध होताच मेसेज येईल.
...
लसीचा प्रचंड तुटवडा आहे. लस उपलब्ध होताच लोक गर्दी करतात. ते टाळण्यासाठी ही लिंक तयार केली आहे. यातून घरबसल्या ऑनलाईन अपॉईंटमेंट घेता येईल. सर्व माहिती योग्य भरल्यास आपल्याला नोंदणीकृत मोबाईल व व्हॉट्सॲपवर संदेश पाठविला जाईल. सर्वांनी सहकार्य करून गर्दी टाळावी.
डॉ. आर. बी. पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी बीड
===Photopath===
140521\14_2_bed_6_14052021_14.jpg~140521\14_2_bed_5_14052021_14.jpg
===Caption===
जिल्हा परिषदेने तयार केलेले जनजागृतीपर बॅनर~डॉ.आर.बी.पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी बीड