बीड : जिल्ह्यात सध्या आरोग्यकर्मिंना कोरोना लस देणे सुरू आहे. परंतू सुरूवातीपासूनच यात तांत्रीक अडचणी दिसत आहे. आतापर्यंत १५०० लाभार्थ्यांना लस देणे अपेक्षित होते. परंतू केवळ ९५० लोकांना देण्यात आली. यातच पहिल्याच दिवशी काहींना किरकोळ लक्षणे जाणवल्याने काहींच्या मनात भीति असल्याचेही दिसत आहे.
कोेरोना लढ्यात सर्वात पुढे होऊन काम केल्याने आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना काेरोनाची लस प्राधान्याने देण्यात आली. बीडमध्ये १६ जानेवारीपासून या माेहिमेला सुरूवात झाली. पहिल्याच दिवशी तांत्रीक अडवणी जाणवल्या. परंतु ऑफलाईन नोंदणी केल्याने काम ९० टक्के झाले. दुसऱ्या दिवशी केवळ साॅफ्टवेअरद्वारे नोंदणी करण्यात आली. त्यामुळे ५०० पैकी केवळ १४२ लाभार्थ्यांना लस मिळाली. तिसऱ्या दिवशी पुन्हा थोडं सुरळत झाल्याने उद्दिष्ट ७१ टक्के पूर्ण झाले. आता शुक्रवारी यात आणखी वाढ होईल, असा विश्वास आरोग्य विभागाने वर्तविला आहे.
दरम्यान, सुरूवातीच्या दिवशी ३४ लोकांना ताप, अंगदुखी, डोकेदुखी अशी किरकोळ लक्षणे जाणवली होती. त्यामुळे इतरांच्या मनात भिती होती. आरोग्य विभागाने अशी लक्षणे जाणवत असतात, त्यात धोका नसल्याचा दावा केला आहे. तसेच लस घेतलेल्या लाभार्थ्यांनीही सकारात्मक संदेश दिल्याने लाभार्थी पुढे येतील, असे वाटते.
आठवड्यातील चार दिवस लसीकरण
आठवड्यात चार दिवस लसीकरण होणार आहे. मंगळवार व बुधवार आणि शुक्रवार व शनिवार असे दिवसांचे नियोजन असेल.
कोट
पहिल्या दिवसापासून थोड्याफार तांत्रीक अडचणी आहेत. त्यामुळे थोडे लाभार्थी कमी झाले. परंतु यातून नकारात्मक काहीही नाही. शुक्रवारपासून हा आकडा नक्की वाढेल, असा विश्वास आहे.
डॉ.संजय कदम
नोडल ऑफिसर, लसीकरण