शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

Corona Virus : संचारबंदी शिथिलतेची वेळ बदली ; सकाळी-सकाळी व्यापारी,नागरिकांची उडाली तारांबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2020 4:37 PM

सुरुवातीला 11 ते 3 यावेळेत संचारबंदी शिथिल करण्यात आली होती

ठळक मुद्देदुकानदाराकडून ग्राहकांना शिस्त लावण्याचा प्रयत्नअचानक वेळ बडल्याने व्यापारी व ग्राहकांची पळापळ 

माजलगाव : संचारबंदीची वेळ शनिवारी अचानक बदलल्याने व्यापाऱ्यांना  सकाळी सकाळी उठून आपली दुकाने उघडावी लागली तर ग्राहक सकाळीच साहित्य खरेदीच्या रांगेत उभा दिसून आले.  विशेष म्हणजे , व्यापारी देखील ग्राहकांना शिस्तीचे धडे देऊन रांगेत येण्याचा आग्रह करत आहेेेत. ग्राहक देखील शिस्तीचे पालन करताना दिसून येत होते.

मागील आठवड्यात संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवेसाठी दुपारी 11 ते 3 या काळात संचारबंदी शिथिल करण्यात येत होती. परंतु या दरम्यान अनेक जण काहीच काम नसताना रस्त्याने फिरत असल्याचे चित्र पहावयास मिळत होते. रस्त्यावरील गर्दी कमी करावी या उद्देशाने प्रशासनाने शनिवारी रात्री अचानक निर्णय घेऊन रविवारपासून अत्यावश्यक सेवेसाठी सकाळी सात ते साडे नऊ ही वेळ दिली. ही वेळ कळताच  9 -10 वाजता दुकानात उघडणारे व्यापारी धावत पळत सकाळी 7 वाजता बरोबर दुकान उघडून बसले होते. 

दुकानदाराप्रमाणेच ग्राहक देखील सकाळी सात वाजल्यापासून पिशव्या घेऊन फिरताना दिसत होते. सकाळची वेळ असल्यामुळे अनेक जण उठलेच नव्हते तर बिनकामाचे लोक इकडे फिरकलेच नाहीत. यामुळे किराणा साहित्य व भाजीपाला घेण्यासाठी मोजकेच लोक बाहेर पडले होते यामुळे रस्त्यावर देखील गर्दी जास्त दिसून आली नाही. काहीजण विनाकारण फिरणारे बाहेर येइपर्यंत सर्व व्यापार बंद दिसू लागले. व दहा वाजल्यापासून सर्व रस्ते सामसूम झाल्याचे चित्र पाहावयास मिळत होते.      दरम्यान व्यापाऱ्यांनी ग्राहकांना ओट्याच्या खाली उभा करून दुरूनच त्यांना पाहिजे असलेले सामान दिले जात होते तर अनेक दुकानदारांनी दुकानाबाहेर हात धुण्यासाठी व्यवस्था केली होती. ग्राहक देखील या सर्व बाबींचे पालन करताना दिसत होते. हे सर्व सुरू असताना कोठेही छोटी-मोठी कुरबूर देखील पाहावयास मिळाली नाही. यावरून सर्व जण कोरोना विरोधात एकीने लढत असल्याचे चित्र सकाळी-सकाळी पाहावयास मिळाले.व्यापाऱ्यांना सकाळी-सकाळी येण्याची ही पहिलीच वेळ असल्याने व सर्वांनी वेळेत दुकाना उघडुन त्या वेळेत स्वतःहून बंद देखील केल्या यामुळे प्रशासनाचा देखील ताण कमी झाला.आम्ही सर्व व्यापाऱ्यांना सोशल मीडियाद्वारे कोणतेही साहित्य जास्त दरात विक्री करू नये असे कळवले असून प्रत्येक दुकानदारांनी ग्राहकांना सेवा देताना शिस्तीत व लांब अंतर ठेवून व्यवहार केला. सकाळची वेळ असली तरी या काळात विनाकारण फिरणा-या लोकांचा त्रास कमी झाला.-- संजय सोळंके , तालुका अध्यक्ष किराणा  असोसिएशन

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीड