धारूर : कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे तालूक्यातील रुईधारूर येथील १७ व १८ मार्च रोजी होणारी रानोबा याञा रद्द करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. या यात्रेस पुणे आणि मुंबई येथील भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते.
ग्रामस्थांनी रानोबा यात्रा महोत्सवाचे मार्च १७ व १८ या दोन दिवशी आयोजन केले होते. अत्यंत प्रसिद्ध असलेल्या या यात्रेत १७ मार्च रोजी गाडया ओढण्याचा व सांस्कृतिक कार्यक्रम आणि १८ मार्च रोजी जंगी कुस्त्यांचे सामने आयोजित केले होते. मात्र राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे राज्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे. तसेच यात्रेत पुणे आणि मुंबई येथील भाविक मोठ्या प्रमाणावर येत असल्याने ग्रामस्थांनी खबरदारी म्हणून यात्रा महोत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यात्रेसाठी येणारे भाविक आणि मल्ल यांनी याची नोंद घेण्याचे आवाहन ग्रामस्थांतर्फे करण्यात आले आहे.