शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
4
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
5
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
6
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
7
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
8
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
9
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
10
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
11
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
12
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
13
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
14
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!
15
‘कॉर्पोरेट’ प्रचार, फतवे अन् व्हायरल इंडिया; निवडणुकीचा प्रचार झालाय हाय-टेक
16
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

corona virus : बीडमध्ये कोरोनाचा रुग्ण आढळल्याची अफवा; आरोग्य यंत्रणेची धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2020 7:22 PM

ज्या ठिकाणी आरोग्य पथक पोहचले त्या गावात ग्रामस्थांनी मोठा जमाव केला होता.

ठळक मुद्देअफवांवर विश्वास ठेवून घाबरू नका, आरोग्य यंत्रणेचे आवाहन सदरील व्यक्तीची तपासणी केली असता त्याला कोरोनाची कसलीच लक्षणे नाहीत

बीड : कल्याणहून परतलेल्या व्यक्तिला सर्दी, खोकला झाल्याचे समजताच त्याला ‘कोरोना’ झाला, अशी अफवा पसरवली. त्यानंतर आरोग्य विभागाची चांगलीच धावपळ झाली. सदरील व्यक्तीची तपासणी केली असता त्याला कोरोनाची कसलीच लक्षणे नसून ही अफवा असल्याचे आरोग्य विभागाने जाहिर केले आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवून घाबरून जावू नये, असे आवाहन पुन्हा एकदा आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

कल्याण येथे नौकरीस असलेल्या ३५ वर्षीय व्यक्ती गत महिन्यात बीडमध्ये आला मुळचा तो पाटोदा तालुक्यातीलच असून त्याची बहिणही बाजुच्याच गावातील रहिवाशी आहे. गुरूवारी ते बहिणीच्या हट्टापायी तिच्या गावी गेले. त्यांना खोकला असल्याने आणि काही लोकांना ते मुंबई-कल्याणहून आल्याचे समजल्याने त्यांनी याला कोरोनाचे स्वरूप दिले. ही माहिती आरोग्य विभागाला समजताच नायगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथक संबंधित गावात पोहचले. त्यांची तपासणी केली असता त्यांना छातीत दुखणे, लिव्हरवर सुज, उच्च रक्तदाब असे आजार असल्याचे समजले. त्याने कल्याणमध्ये या आजारावर उपचार घेतल्याचे कागदपत्रांची तपासणी केल्यावर समोर आले. असे असले तरी त्याला शुक्रवारी तपासणीसाठी आरोग्य केंद्रात बोलावले असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ.गणेश गुंड यांनी सांगितले. त्याच्यात कोरोनाची कसलीच लक्षणे नसल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एल.आर.तांदळे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. आमचे पथक नजर ठेवून असल्याचेही ते म्हणाले.

ग्रामस्थांचा जमाव ज्या ठिकाणी आरोग्य पथक पोहचले त्या गावात ग्रामस्थांनी मोठा जमाव केला होता. अनेकांनी त्याला गावातच नको, असा पवित्रा घेतल्याचे सांगण्यात आले. परंतु आरोग्य विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सर्वांना कोरोनाबाबत सखोल मार्गदर्शन केले. त्यांच्या मनातील गैरसमज दुर केले. त्यानंतर हा जमाव शांत झाला आणि आरोग्य पथक परतले.

अफवांवर विश्वास ठेवून घाबरू नकाथोडासाही खोकला किंवा ताप आला की त्याला कोरोनाचे वळण दिले जात आहे. प्रत्येक सर्दी, खोकला किंवा दुसऱ्या शहरातून आलेल्या व्यक्तीला कोरोना असेलच असे नाही. जर कोणी संशयीत आढळला तर आरोग्य विभाग सतर्क आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवून घाबरून जावू नये, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार यांनी केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोनाBeedबीडdoctorडॉक्टर