- पुरूषोत्तम करवा
माजलगाव: पश्चिम महाराष्ट्र व कर्नाटक मधील साखर कारखाने 4-5 दिवसापुर्वी बंद करण्यात आल्याने ऊसतोड काम मजुरांचे लोंढेच्या लोंढे येणे सुरूच असुन एकाच वाहणात 15-20 मजुर येत असुन यात बालकांचाही समावेश असुन सोमवारी साखर कारखाना हंगाम आटोपून परत येथे आलेल्या 40 ऊसतोड कामगाराना शहराबाहेरील एका शाळेत निगराणी खाली ठेवण्यात आले .
पश्चिम महाराष्ट्र व कर्नाटकामधील साखर कारखान्याला माजलगाव तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर लोक ऊस तोडणीसाठी जात असतात हे कारखाने 4-5 दिवसांपूर्वीच बंद करण्यात आल्याने याठिकाणी ऊसतोडणीसाठी गेलेले मजुर रात्री उशिरा आपल्या गावात येत आहेत त्यामुळे त्यांची तपासणी देखील न करताच ते घरी येत असल्यामुळे गावागावात या मजुरांमुळे कोरोनाची लागण लागण्याच्या भितीने अनेक गावात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या या मजुरांंचे लोंढे लोंढे माजलगाव शहर व ग्रामीण भागात येत असून एकाच वाहनात 15 ते 20 मजूर येत असून यात बालकांचा देखील समावेश आहे.
माजलगाव शहरातील व परिसरातील काही कुटुंबातील लहान-मोठे 40 जण उसतोडीसाठी पश्चिम महाराष्ट्रात गेले होते, सोमवारी पहाटे तीन वाजता एका ट्रॅक्टर मध्ये हे सर्व माजलगाव शहरात दाखल झाले असता त्यांना परभणी फाटीवर अडवून तपासणी केली असता त्यांच्या हातावर शिक्के दिसून आले त्यामुळे या सर्व लोकांना तहसीलदार प्रतिभा गोरे यांचे आदेशानुसार शहराबाहेरील एका शाळेत निगराणी खाली ठेवण्यात आले व या ठिकाणी आल्यानंतर खाण्यापिण्याची काहीच व्यवस्था केली नसल्याचे हे लोक सांगत आहेत. तर निगरानीत असलेल्या सर्वांची खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यात येत असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ अनिल परदेशी यांनी दिली.