आष्टी : तालुक्यातील सर्वाधिक मोठी यात्रा समजल्या जाणार्या वाळुंज येथील भैरवनाथ यात्रा उत्सवात दरवर्षी हजारोच्या संख्येने भाविक दाखल होत असतात. कोरोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने सर्वच धार्मिक यात्रा, उत्सव, कार्यक्रम यावर रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.त्यामुळे रविवार दि.१२ एप्रिल रोजी होणारा भैरवनाथ यात्रा उत्सव रद्द करण्याचा निर्णय वाळुंज ग्रामस्थांनी शनिवारी घेतला.
कोरोना विषाणूमुळे जगभरात घबराट निर्माण झाली आहे. ग्रामीण भागात ही सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. कोरोनाचा परिणाम या यात्रा उत्सवांवर ही होऊ लागला आहे.सर्वच धार्मिक स्थळे मस्जिद,मंदिर,बंद ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.या पार्श्वभूमीवर यात्रा उत्सव रद्द करण्याचा निर्णय वाळुंज ग्रामस्थांनी घेतला आहे.वाळुंज येथील यात्रा उत्सवात २५० वर्षाची परंपरा आहे. हा यात्रा उत्सव रविवार दि.१२ एप्रिल पासुन सुरू होणार होता वाळुज परिसरातील १० ते १२ गावातील पालखीची मिरवणूक या यात्रा उत्सवामध्ये सहभागी होत असते,शेजारच्या गावासह गावातील ग्रामस्थ नौकरी,व्यवसाय,व्यापार,उद्योग,कामासाठी गेलेले पुणे,मुंबई,पनवेल,नगर,औरंगाबाद,नाशिकसह महाराष्ट्र भरातुन दर्शनासाठी भाविक हजारोंच्या संख्येने दाखल होत असतात. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढु नये यात्रा करायची की नाही या संदर्भात भैरवनाथ मंदिरात ग्रामस्थांची बैठक झाली.
या बैठकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे तालुका उपाध्यक्ष रघुनाथ शिंदे,सरपंच घनश्याम खाडे,उपसरपंच शिवाजी राऊत,बलभीम बाप्पू खांडे,सोमनाथ शिंदे,रामदास वहाटुळे,विष्णू खाडे,साहेबराव खाडे,विठ्ठल खाडे,रविंद्र गावडे,लहू गावडे,भरत शोले,बाबा बळे, राजू बळे,अशोक राऊत,विष्णू वाहाटुळे,बाळासाहेब शिंदे रामदास शिंदे,अरुण बळे,पुजारी आजिनाथ चव्हाण,सोमनाथ चव्हाण,चरपटीनाथ चव्हाण आदी ग्रामस्थांनी प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाचे यावर्षी यात्रा न भरवण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला आहे.