बीड : जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात आठ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले. यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या ५५ इतकी झाली आहे.
सोमवारी एकूण ५७ स्वॅबपैकी ५० अहवाल निगेटिव्ह आले होते. ७ अहवाल प्रलंबित होते. यापैकी मंगळवारी दुपारी २ अहवाल पॉझिटिव्ह आले तर पाच अहवाल अनिर्णित होते. मंगळवारी जिल्हयातील आणखी २८ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल रात्री प्राप्त झाला. त्यानुसार २२ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून ६ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
आज या भागात आढळले बाधित :हाळंब (परळी) - २बारगजवाडी (शिरूर) - २कारेगाव ( पाटोदा ) - १वाहली ( पाटोदा) -१ बीड शहर ( दिलीपनगर ) - २