शहरं
Join us  
Trending Stories
1
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
2
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
3
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
4
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
5
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
6
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
7
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
8
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
9
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
11
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
12
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
13
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
14
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
15
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
16
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
17
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
18
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
19
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

CoronaVirus : प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळेच बीड कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2020 11:53 AM

आरोग्य, पोलीस यांच्याबरोबरच महसूल, जिल्हा परिषद, नगरपालिका, शिक्षण, बँक, महावितरण, बीएसएनएल, ग्रामपंचायत, पाणीपुरवठा, पत्रकार अशा सर्वांनीच कोरोनावर मात करण्यासाठी दिवसरात्र एक केलेली आहे.

ठळक मुद्दे३३ हजार ऊसतोड मजुरांची तपासणीआधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

बीड : बीड जिल्हा सध्या कोरोनामुक्त आहे. जिल्हा प्रशासनाने सुरुवातीपासूनच केलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळेच बीडचा शून्य कायम राहिला आहे. सीमाबंदी, नियंत्रणकक्ष, विशेष पथके, चेकपोस्ट तपासणी अन् गावपातळीवरील सर्वेक्षणाचा मोठा फायदा झाला आहे. प्रशासनाच्या उपाययोजनांना नागरिकांनी केलेल्या सहकार्यामुळे कोरोना सीमेवरच रोखण्यात यश आले आहे.

जिल्ह्यात ग्रामीण व शहरी भागात प्रतिबंधात्मक उपाययोजनांची जबाबदारी जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अधिनस्थ असलेल्या यंत्रणेची आहे. सुरुवातीपासूनच विदेश, परजिल्ह्यातून आलेल्या लोकांचे सर्वेक्षण करुन माहिती घेतले. त्यांच्याशी वारंवार संपर्क करुन लक्षणे असणाºयांची आरोग्य तपासणी केली. यासाठी विशेष पथके नियुक्त केली. जिल्हा व आरोग्य प्रशासनाकडून वारंवार नागरिकांना सूचना केल्या जात होत्या. याचे पालन नागरिकांनी केले. जे लोक छुप्या मार्गाने आले होते त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यामुळे जरब बसली होती.  याचाच फायदा आतापर्यंत होत आलेला आहे. या उपाययोजनांमुळेच बीड जिल्हा सद्यस्थितीत कोरोनामुक्त आहे.काय केल्या उपाययोजना

२४ तास नियंत्रण कक्षजिल्ह्याच्या ठिकाणी २४ तास नियंत्रण कक्ष स्थापन केला. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार, साथरोग अधिकारी डॉ. पी. के. पिंगळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश शिंदेसह १३ कर्मचारी येथे कार्यरत आहेत. आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल झालेल्या रुग्णांचे संपर्क शोधणे, संशयित प्रवासी शोधणे, बाहेरुन आलेल्यांशी संपर्क साधून लक्षणे आहेत का याची माहिती घेणे ही सर्व माहिती अद्ययावत करण्याचे काम नियंत्रण कक्षातून करण्यात आले.

सीमेवरील चेकपोस्टवर तपासणीजिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. १४ ठिकाणी चेकपोस्ट तयार केल्या. त्या सुरु झाल्यापासून ७४ हजार ६६ लोकांच्या नोंदी घेतल्या. प्रत्येकाची नोंद व आरोग्य तपासणी करण्यात आली.

गावपातळीवर सर्वेक्षणप्रत्येक शहर व गावात आशा स्वयंसेवीकांमार्फत घरोघरी जाऊन दोनदा सर्वेक्षण करण्यात आले.  यात परदेशातून ११८, परजिल्ह्यातून १ लाख ९४ हजार ४१५ नागरिक आल्याचे उघड झाले. सर्वांना होम क्वारंटाईन करुन लक्षणांबाबत माहिती घेण्यात आली. यासाठी जिल्ह्यात तब्बल ४४० पथके नियुक्त करण्यात आली होती. पोलीस निरीक्षक, आरोग्य अधिकारी यांच्यावर ही जबाबदारी सोपवली होती.

३३ हजार ऊसतोड मजुरांची तपासणीऊसतोडणीसाठी बाहेर गेलेल्या मजुरांना जिल्ह्यात आणले. २० चेकपोस्टवर त्यांची नोंद घेऊन आरोग्य तपासणी केली. २८ दिवसांसाठी क्वारंटाईन केले. १ मे पर्यंत ३३ हजार ४११ मजुरांनी जिल्ह्यात प्रवेश केला होता.

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरव्हिडीओ कॉन्फरन्सिंग, ग्रुप कॉलिंग अशा माध्यमातून सूचना केल्या. विविध अ‍ॅपच्या माध्यमातून माहिती संकलित केली. लक्षणे असलेल्या रुग्णांची नोंद घेतली. होम क्वारंटाईन असलेल्यांवर नजर ठेवली. आरोग्य सेतू अ‍ॅपमार्फत स्वत:ची तपासणीही करुन घेण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली. कॉन्टॅक्ट ट्रॅकिंग करण्यात आले.

दररोज १२ हजार लोकांची तपासणीआष्टी तालुक्यातील पिंपळा येथे कोरोनाग्रस्त रुग्ण आढळताच परिसरातील ७ किलोमीटरमधील ११ गावे बंद केली. १०० घरांमागे १ प्रमाणे अशा ३० पथकांमार्फत नियमित २६२० घरांपर्यंत जाऊन त्यातील १२ हजार ३४५ व्यक्तींशी संवाद साधला. लक्षणे असणाºयांची तात्काळ तपासणी केली. १४ दिवस ही प्रक्रिया सुरु होती.

कोव्हीड योध्दा म्हणून यांचा सहभागआरोग्य, पोलीस यांच्याबरोबरच महसूल, जिल्हा परिषद, नगरपालिका, शिक्षण, बँक, महावितरण, बीएसएनएल, ग्रामपंचायत, पाणीपुरवठा, पत्रकार अशा सर्वांनीच कोरोनावर मात करण्यासाठी दिवसरात्र एक केलेली आहे.

सुरुवातीपासूनच प्रतिबंधात्मक उपाययोजना व नियोजन केल्यामुळे कोरोनाला सीमेवर रोखण्यात यश आले आहे. हा कोरोना जिल्ह्यात येऊ नये म्हणून प्रशासन तर प्रयत्न करीतच आहे, मात्र नागरिकांनी देखील काळजी घेणे गरजेचे आहे.- डॉ. आर. बी. पवारजिल्हा आरोग्य अधिकारी.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीड