- पुरूषोत्तम करवामाजलगाव : गुढीपाडवा येण्याच्या एक दिन महिन्या अगोदर शेतकरी आपल्याला कोणता सालगडी ठेवायचा याची चाचपणी करत असतो परंतु यावर्षी कोरोना च्या भीतीने शेतकऱ्यांनी अध्याप सालगडी ठरवले नसून परजिल्ह्यातून कामासाठी आलेल्या लोकांना शेतकऱ्यांनी परत पाठवून एक महिन्याने येण्याचा सल्ला देखील दिला आहे.
गुढीपाडव्याला शेतकरी सर्व नवे-जुने व्यवहार करत असतो. यात प्रामुख्याने आपल्याला किती गडी लागतात हे पाहुन व 2-3 महिण्यांपासुन दुसऱ्याचा चांगला गडी आपल्याला मिळावा यासाठी प्रयत्न केले जातात. एक दुसऱ्याचा गडी लावण्यात अनेक वेळा गावात भांडणे देखील होतात.या वर्षी बुधवारी गुडी पाडवा असतांना 75 टक्के शेतकऱ्यांचे अद्याप सालगडी देखील ठरलेले नाहीत. मागील 10-12 दिवसांपासून कोरोनाच्या भीतीने अनेक शेतकरी आपल्या गावाकडे फिरकलेच नाही तर गावातच राहणाऱ्या शेतकऱ्यांनी कोरोनाच्या भीतीने घराबाहेर निघणे बंद केले व अनेकांनी भेटीगाठी देखील टाळल्याने यावर्षी सालगडी ठरविण्यात उशीर झाला आहे.
माजलगाव तालुक्यात परभणी , सेलू , मानवत , जालना , आष्टी ,परतूर , मंठा आदि या भागातील अनेक लोक आपल्याला मोलमजुरी मिळावी म्हणून आपल्यामुळे मुलाबाळांसह याठिकाणी येतात. परंतु कोरोनाच्या भीतीपोटी अनेक जण इकडे फिरकलेच नाहीत तर अनेक जण आले असतानादेखील शेतकऱ्यांनी त्यांना कोरोना संपल्यानंतर आपण यावे असा सल्ला देऊन त्यांना परत पाठवले.
शेतीच्या मशागतीला पाडव्याचे मुहूर्त टळणार ?अनेक बाहेरगावी राहणारे व आपल्याकडे शेतात काम करण्यासाठी बारदाना नसलेले अनेक शेतकरी पाडव्याच्या दरम्यान आपली शेती ठोक्याने किंवा बटईने देत असतात.परंतु कोरोनाच्या भितीने अनेक शेतकऱ्यांची बटाईदाराशी किंवा ठोक्याने जमीन घेणारांची गाठभेटच होऊ शकली नाही. पाडव्याच्या मुहूर्तावर ठोक्याने किंवा बटईने घेणारे लोक शेतीच्या मशागतीला सुरुवात करतात. परंतु यावर्षी सालगडी व जमीन ठोक्याने किंवा बटईने देण्यास उशीर झाल्याने शेतीच्या मशागतीला पाडव्याचे मुहूर्त टळणार आहे .
गावागावात अनेक बाहेर जिल्ह्यातील लोक सालगडी म्हणून राहण्यासाठी आले होते परंतु कोणाच्या भीतीमुळे बाहेर जिल्ह्यातील लोकांना सालगडी म्हणून अद्याप कोणीच ठरवलेले नसल्याने व बटाईने जमीन दयायला उशीर झाल्याने यावर्षी शेत कामाला उशिरच होण्याची शक्यता आहे.--- राजेंद्र भंडारी , शेतकरी