- अनिल भंडारी बीड : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे मोठ्यांसह छोट्यांचे ही कंबरडे मोडले आहे. दिवसभर गावात फिरुन फुगे विक्रीतून मियां -बिवीचा गुजारा करणाऱ्या इर्शादभार्इंच्या फुग्यालाही कोरोनाची टाचणी टोचल्याने त्यांची जीवनघडी विस्कटली आहे. दिवसाकाठी दोन ते अडीच हजार रुपये मिळविणाऱ्या इरशादभार्इंच्या पदरात सध्या ४०- ५० रुपये कसेबसे पडत आहेत.
शहरातील सय्यदअली कॉलनी भागात राहणारे इर्शादभाई त्यांच्या सायकलवर फुगे लावून विक्री करतात. छोट्या वस्तीपासून वर्दळीच्या रस्त्यापर्यंत ज्या भागात लहान मुलांचा वावर असतो तेथे फुगे विकून दोन पैसे कमावतात. रडणाऱ्या मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविताना कुटुंबाची गुजराण करण्यासाठी त्यांनी हा मार्ग निवडला. दोन वर्षांपासून स्वत:ची सायकल, हवा भरण्याचा पंप आणि फुग्यांची पिशवी घेऊन इरशादभाई गावभर फिरतात.
सायकलच्या हॅँडलवर लावलेले फुगे पाहून बच्चे कंपनीबरोबरच मोठेही आकर्षित होतात. परंतू २१ मार्चपासून कोरोनामुळे उद्भवलेली स्थिती आणि त्यानंतरच्या लॉकडाऊनमुळे सुरुवातीचे काही दिवस वगळले तर नंतर एक दिवसाआड केवळ अडीच तासच त्यांना फुगे विकता येतात. या अडीच तासात गावभर फिरणे अशक्यच. यात्रा जत्रा, लग्नसराई वा इतर कार्यक्रम नसल्याने आजुबाजुला उभे राहून होणाºया विक्रीलाही ब्रेक लागला आहे. त्याचबरोबर फुग्यांची होणारी विक्रीही अत्यल्प होत आहे. जेमतेम ४० - ५० रुपये मिळतात, असे इर्शादभाई म्हणाले.
हम बुढों को कितना लगता? इर्शादभाई व त्यांची पत्नी हे दोघे एका घरात राहतात. इतर सर्व वेगळे राहतात. हम बुढों को कितना लगता साब, जो है उसीसे गुजारा कर लेते है. लोकांनी धान्य, किराणाची सहानुभूतीपूर्वक मदत केली. रेशनचे धान्यही मिळाले. त्यावरच दिवस काढत असल्याचे ते म्हणाले.
बच्चे कंपनीची प्रतीक्षा, भेट झाली दुर्मिळधडधाकट असताना कष्ट झेलत हमाली कामातून कुटुंबाचा उदरनिर्वाह केला. उम्र का तकाजा होने से अब हमाली काम नहीं होता, इसलिए गुब्बारे बेचता हूं असे इर्शादभाई म्हणाले. सध्या फुगेवाले इर्शादभार्इंची गल्लोगली वाट पाहणाऱ्या मुलांशी लॉकडाऊनमुळे भेट दुर्मिळ झाली आहे. विविध क्षेत्रातील अशा अनेक इर्शादभाईंच्या रोजी रोटीकडे कोणी लक्ष देणार आहे काय?
ये आफत नहीं थी तब ५००-१००० गुब्बारे बिकते थेसाब, जब ये आफत नहीं थी तब ५००- १००० गुब्बारे बिकते थे, अब बसर नहीं होता. क्या करेंगे, चायपानी का खर्चा निकल जाता, असे म्हणताना इर्शादभार्इंच्या मनात शल्य होते, परंतू आहे त्या परिस्थितीचा मुकाबला करण्याची धडपड त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती.