- पुरुषोत्तम करवामाजलगाव : बीड जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत पणन महासंघाने शेतक-यांना कागदपत्रासह नोंदणी करावयास लावली होती. जिल्ह्यात अशा नोंदणीकृत 25 हजार शेतक-यांच्या कापसाची मापे न झाल्याने शेतकऱ्यांना घरीच कापसाला राखण राहण्याची वेळ आली आहे. कोरोना कधी जाईल व आपल्या कापुसाचे कधी माप होईल या विवंचनेत शेतकरी आहे.
शासनाने तात्काळ कापुस खरेदी केंद्र सुरू करावीत अन्यथा कापसाची प्रत खराब होत असल्याने शेतकऱ्यांना आपला कापुस बेभाव विकायची वेळ येते की काय ? यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने एकविस दिवसांचा लाॅकडाऊन केला होता. त्यामुळे 14 एप्रिल नंतर तरी कपाशीची विक्री करता येईल अशी अपेक्षा शेतक-यांना होती परंतु कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 मे पर्यंत लाॅकडाउन कायम ठेवल्याने कापूस विक्री मात्र आता लाॅकडाउनमध्ये अडकली आहे.
जिल्ह्यात नगदी पिक म्हणुन कपाशीची ओळख आहे. मोठ्या प्रमाणावर कोरडवाहू, बागायदार शेतकरी कपाशीची लागवड करतात. यावर्षी देखिल मोठी लागवड करण्यात आली होती. पावसाने हुलकावणी देत, बोंडअळीने केलेला हल्ला यातुन कसाबसा शेतक-यांने मोठ्या जिकीरीने कापुस वाढविला होता. त्यातही मजुरांची असलेली वाणवा व त्यांना दुपटीने द्यावा लागणारा रोजगार यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला होता. त्यात भर म्हणजे विक्रीसाठी शेतक-यांना अडचणींचा डोंगर पार करावा लागला. खाजगी कापुस खरेदी केंद्रावर कापुसाला 1 हजार ते पंधराशे रूपये क्विटलला फटका बसत असल्याने व शासकीय खरेदी केंद्र कधी चालु तर कधी बंद होत राहिल्याने 40 टक्के शेतकऱ्यांचा कापस घरीच पडुन असल्याने शेतकऱ्यांची रात्रीची झोप उडाली आहे. शासकीय कापुस केंद्रावर कापुस घालण्यासाठी बाजार समितीकडे नोंद करूनही महिणा उलटला तरी कपाशी विक्रीची सोय लागली नाही.तर विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांचेे पैसे महिना - दिड महिण्याचा कालावधी लोटला तरी कपाशीचे पैसे मिळत नाहीत तर दरवाढीच्या अपेक्षेने घरात ठेवलेली कापुस काहीही भावात घालण्याची शेतकऱ्यांना ओढ लागली.
बीड जिल्ह्यात बाजार समितीमार्फत शासनाच्या आदेशावरून 13 मार्चपर्यंत कापसाची नोंद करण्यात आली. जिल्ह्यातील आठ बाजार समित्यांकडे 24 हजार 921 शेतकऱ्यांनी नोंद केली होती. यात सर्वात जास्त बीड तालुक्यात 6 हजार 371शेतकऱ्यांनी तर सर्वात कमी अंबाजोगाई तालुक्यात 106 शेतकऱ्यांनी नोंद केली होती. परळी तालुक्यात 4 हजार 850 ,माजलगाव तालुक्यात 4 हजार 7 , वडवणी तालुक्यात 2 हजार 190 ,गेवराई तालुक्यात 2 हजार 455 , धारूर 3 हजार 756 तर केज तालुक्यात 1 हजार 186 शेतकऱ्यांनी नोंद केलेली आहे.
शासन निर्णयाची वाट पाहत आहोतकापूस खरेदी सुरू करा पणन महासंघाच्या वतीने बंद करण्यात आलेली कापूस खरेदी पूर्ववत सुरू करावी यासाठी आ.प्रकाश सोळंके व मी उपमुख्यमंत्री अजित पवार व पालकमंत्री धनंजय मुंडे या बोललो असुन त्यांनी या बाबत तात्काळ निर्णय घेवुन कापसाची खरेदी सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे. खरेदीसाठी जिल्ह्यातील सर्व बाजार समिती तयार असुन शासन निर्णयाची वाट पहात आहोत.- अशोक डक, सभापती बाजार समिती