- नितीन कांबळेकडा - तीन हजार लोकसंख्या असलेल्या एका गावातील दोघे नगर जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कात आले होते. त्यामुळे त्यांना नगरमध्ये अलगीकरन केले होते. परंतु त्यांनी पहाटेच तेथून पळ काढत गाव गाठले. ही माहिती प्रशासनाला समजताच पुन्हा त्यांना उचलून नगरला दाखल केले. इथे एकाचा अहवाल पोझीटिव्ह आला तर दुसऱ्याचा प्रलंबित आहे. त्या दोघांच्या प्रवासाने गावासह शेजारील गावे देखील भयभीत झाले आहेत.
आष्टी तालुक्यातील दोघेजण मरकज येथे धार्मिक कार्यक्रमातुन आलेल्या लोकांशी संपर्कात आले. आरोग्य विभागाने तपासणी केली. आणि खबरदारी म्हणून हातावर शिक्के मारून शासकीय रुग्णालयात क्वाॅरंटाईन केले. पण यानी 2 एप्रिल रोजी मध्यरात्री दवाखान्यातुन पलायन करून नगर जिल्हा सीमा ओलांडून बीड जिल्ह्य़ातील आष्टी तालुक्यातील गावा गाठले. गावात आरोग्य विभागाला माहिती देऊन होम क्वाॅरंटाईन करण्यात आलेले दोघे जणांना घराच्या बाहेर न पडण्याच्या सुचना केल्या. ६ एप्रिल ला पुन्हा यांना तपासणी साठी अहमदनगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील एकाचा अहवाल पोजिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. या गावात येणार्या सर्व सिमा खोदून बंद करण्यात आल्या असुन दोनही कुटुंबातील सदस्य यांना होम क्वाॅरंटाईन करण्यात आले आहे.
इतर ठिकाणी प्रार्दुभाव होऊ नये म्हणून सुंबेवाडी , धनगरवाडी, काकडवाडी , ढोंबळसांगवी, खरडगव्हाण, लोणी, नांदूर, सोलापूरवाडी , खुंटेफळ , पुंडी , कोयाळ , ही गावे अनिश्चित काळासाठी पुर्ण वेळ बंद करून संचारबंदी लागु करण्यात आली