परळी : शहर व परिसरात देश व परदेशातून आलेल्या दहा जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते . दहा ही जणांचे स्वॅब अहवाल गुरुवारी प्राप्त झाले असून ते निगेटिव्ह आले आहे असे आरोग्य प्रशासनाच्या वतीने शुक्रवारी सांगण्यात आले.
कोरोना पार्श्वभूमीवर परळी शहर व परिसरात तालुका प्रशासना च्या वतीने काही ठिकाणी चेकपोस्ट लावण्यात आले असून बीड आणि परभणी जिल्ह्यातिल रस्त्या च्या सीमा बंदीही करण्यात आल्या आहेत व बाहेरून बाहेरगावाहून आलेल्या लोकांचीही कसून चौकशी करण्यात येत आहे . दरम्यान बाहेरून आलेल्या परळीच्या ग्रामीण भागात पाच व शहरी भागात आलेल्या पाच जणांच्या घशाचे स्वॅब प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले होते या दहा ही जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे त्यामुळे सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे
परळी तालुक्यातील दहा जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉलक्ष्मण मोरे व वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर रामेश्वर लटपटे यांनी दिली