शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती मात्र ऐनवेळी भाजपा धक्का देणार?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
3
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
4
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
5
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
6
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
7
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
8
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
9
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

CoronaVirus : ओ, मावशी, मामा.. रांगेत थांबा अन् सांगा सर्दी, ताप, खोकला आहे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2020 1:07 PM

चेक पोस्टवर येताच ऊसतोड मजुरांची थर्मल गनद्वारे तपासणी केली जात आहे.

ठळक मुद्देसर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच त्यांना जिल्ह्यात प्रवेश दिला जात आहे. उसतोड कामगारांना आरोग्य पथकांकडून विचारपूस

बीड : ओ, मावशी, दादा, भैय्या, काका, मामा... कारखान्यावरून आला आहात ना, तर रांगेत थांबा. एक एक पुढे या आणि सांगा सर्दी, ताप, खोकल्याचा काही त्रास आहे का? असे संभाषण सध्या प्रत्येक चेक पोस्टवर होत आहे. जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या ऊसतोड मजुरांची चौकशी करून वैद्यकीय तपासणी केली जात आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच त्यांना जिल्ह्यात प्रवेश दिला जात आहे. 

रोजगारासाठी साखर कारखान्यावर गेलेले ऊसतोड मजूर मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात परतू लागले आहेत. त्यांची आरोग्य तपासणी जिल्ह्यातील १९ चेक  पोस्टवर केली जात आहे. यासाठी आरोग्य, पोलीस, शिक्षक, कृषी, महूसल विभागाचे अधिकारी, कर्मचारी असलेले पथक तैनात केले आहे. आलेल्या प्रत्येक व्यक्तीची चौकशी करून माहिती घेतली जात आहे. सर्दी, ताप, खोकला, श्वास घ्यायला त्रास होत आहे का? असे विचारले जात आहे. एखाद्याला थोडेही लक्षणे दिसताच त्याला बाजूला घेऊन त्याची वैद्यकीय तपासणी केली जात आहे. आजारानुसार त्यांच्यावर औषधोपचार केले जात आहेत. यासाठी डॉक्टरांचे पथक चेक पोस्टवर २४ तास नियूक्त केलेले आहेत.

सुदैवाने, एकालाही लक्षणे नाहीत जिल्ह्यात १२ हजार (मंगळवारी रात्रीपर्यंत) ऊसतोड मजूरांनी प्रवेश केलेला आहे. त्यांच्यापैकी एकालाही कोरोनाची लक्षणे अद्याप तरी जाणवलेले नाहीत. त्यांना २८ दिवस क्वारंटाईन करण्यात आलेले आहे. एवढे मोठे प्रवेश होऊनही कोणालाच लक्षणे नसने, ही बाब दिलासादायक आहे.

क्वारंटाईन केलेल्यांनी सूचनांचे पालन कराप्रत्येक मजुराची रितसर वैद्यकीय तपासणी केली जात आहे. अद्याप कोणालाच कोरोनाची तीव्र लक्षणे जाणवलेली नाहीत. प्रत्येक चेक पोस्टवर पथकांची नियुक्ती केलेली आहे. क्वारंटाईन केलेल्या लोकांनी सुचनांचे पालन करावे.- डॉ.आर.बी.पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीड