- अनिल महाजनधारूर : राजस्थान मधील उदयपूर येथे झालेल्या राष्ट्रीय कला प्रदर्शनस गेलेले महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यातील 11 नवोदीत शिल्पकार लाॕकडाऊनमुळे अडकले होते. तब्बल दिड महिन्यानंतर त्यांना सर्वांना घरी परतण्याची संधी मिळाली असून राज्य शासनाने त्यांना आणण्याची सोय केली. दोन गट करून त्यांना आणण्यात आले असून ते आज आपल्या गावी पोहचतील. दरम्यान, शिल्पकार अडकल्याबाबत 'लोकमत'ने वृत्त प्रकाशित केल्यामुळे घरी परण्याचा आनंद लवकर घेता आल्याचे त्यांनी आवर्जून सांगीतले .
महाराष्ट्र राज्यातील अकरा शिल्पकार राजस्थान येथे केंद्र सरकारच्या शिल्पग्राम उदयपूर येथे फायबर प्रोजेक्टच्या निमित्त गेले आहेत. फायबर प्रोजेक्ट सुरवात 3 मार्च ते 23 मार्च पर्यंत होते ते संपल्या वर त्याना 24 मार्चचे विमानाची तिकीट बुकिंग केली होती पण 23 मार्च ला राञी 12 वाजता देशात लॅाकडाउन केल्यामुळे तिकीट कॕन्सल करण्यात आले त्यामुळे त्यांना परत येता आले नाही . राजस्थान उदयपूर येथे जे अकरा जण होते ते राज्यातील विविध जिल्हयातील आहेत . यामध्ये सुधीर उमाप ( बीड ) ,किरण भोईर (नाशिक ) वरूण भोईर ( नाशिक ), नहर्ष पाटील (धुळे ) अभिषेक साळवे(अ.नगर ), प्रदीप कुंभार (कोल्हापूर ), बीरदेव एडके (कोल्हापूर) ,अभिषेक कुंभार (कोल्हापूर), संदीप वडगेंकर (कोल्हापूर), सुमेध सावंत (रत्नागिरी ) ,आकाश तीरिमल (मुंबई ) यांचा समावेश आहे
शिल्पप्रदर्शन संपून महिना उलटलाप्रदर्शन संपून लॉकडाऊनमध्ये अडकलेला महिना उलटला. यामुळे सर्वांना घराची ओढ लागली होती. येथे राहणे व जेवणाची सोय होती माञ दिवस काढणे अवघड जात होते. दै.लोकमतमध्ये वृत्त प्रकाशीत होताच उदयपूरच्या जिल्हाधिकारी आनंदीजी यांना परिस्थिती लक्षात आणूण दिली. त्यानंतर त्यांनी सर्व परिस्थिती जाणूण घेत नाशिक, धुळे, अहमदनगर व बीडच्या सहा जणांचा एक गट तर कोल्हापूर, रत्नागिरी येथील शिल्पकारांचा दुसरा गट करून महाराष्ट्रात येण्याची व्यवस्था केली. मंगळवारी हे नवोदीत शिल्पकार आपल्या घरी पोहचले. यावेळी त्यांच्या कुटुंबांनी समाधान व्यक्त केले.
चार राज्यांचे कला व संस्कृतीचे दर्शन घडवणारे केंद्रउदयपूर शहरापासून चार किमी वर राजस्थान सरकार केंद्रशासनाचे मदतीने साठ ते सत्तर एक्कर मध्ये हे शिल्प ग्राम असून महाराष्ट्र गुजरात राजस्थान व गोवा या चार राज्याचे संस्कृतीचे दर्शन येथे आहे मुंबईतील गणेशउत्सवाचे शिल्प तयार करण्या साठी या निमंञीत शिल्पकाराांना येथे बोलवण्यात आले होते. मातीकाम संपले होते फक्त फायबरचे काम शिल्लक राहीले आहेत. ते इतर राज्यातील कलाकार करणार आहेत.यांचे मांडणी साठी पुन्हा जावे लागणार आहे असे नवोदीत शिल्पकार सुधिर उमाप यांनी सांगीतले.