शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

CoronaVirus : पोलिसांच्या अंगावर गाडी घालणाऱ्या डॉक्टरला पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2020 4:08 PM

डॉक्टराने पोलिसांच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला

अंबाजोगाई : संचारबंदीच्या बंदोबस्तावर असलेले राज्य राखीव पोलीस दलाचे (एसआरपी) जवान चौकशीसाठी गाडी थांबवण्याचा इशारा करत असतानाही गाडी न थांबवता त्यांच्या अंगावर घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या डॉ.नितीन पोतदार याला सह.दिवानी कनिष्ट स्तर न्यायदंडाधिकारी एे.के.चौगुले यांनी ९ एप्रील पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन व संचारबंदी घोषित करण्यात आली आहे. केवळ अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी सकाळी ७ ते ९.३० ही वेळ खरेदीसाठी ठेवण्यात आली आहे. इतर वेळी कोणीही घराबाहेर येऊ नये. असे शासकीय आदेश आहेत. संचारबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अंबाजोगाई शहरात एसआरपीची एक तुकडी पाचारण करण्यात आली असून गुरुवारी दुपारी त्यांनी बंदोबस्ताला सुरुवात केली. या तुकडीतील सहा. फौजदार अशोक  साहेबराव प्रधान, पो.ह. मालकर, राठोड, भदरगे, शेख, खाडे, सानप, गलबे, जयवड आणि अंबाजोगाई शहर ठाण्यातील संजय बारगजे, घोळवे यांना बसस्थानकावर बंदोबस्तासाठी नेमण्यात आले होते. सहा. फौजदार प्रधान यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रात्री ८.३० वाजताच्या सुमारास डॉ. नितीन पोतदार परळीकडून चारचाकी गाडीतून आले. पोलिसांनी सदरील गाडी थांबविण्यासाठी इशारा केला परंतु, डॉ. पोतदार यांनी न जुमानता गाडी तशीच पुढे नेली आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकातून वळवून पुन्हा बस स्थानकाकडे आणली. 

यावेळी मात्र पोलिसांनी ती गाडी थांबविण्याचा प्रयत्न केला असता डॉ. पोतदार यांनी गाडी न थांबवता त्यांच्या अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर गाडीतून उतरत मद्यधुंद असलेल्या डॉ. पोतदार यांनी मी आर्मीचा मोठा अधिकारी आहे, तुम्ही माझी गाडी कशी अडवली असे म्हणत शिवीगाळ सुरु केली. तुम्हाला व्यवस्थित नोकरी करायची कि नाही, तुमची बघतो अश्या धमक्या दिल्या. याप्रकरणी गुरुवारी रात्री उशिरा डॉ. नितीन पोतदार यांच्या विरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न आणि शासकीय कामकाजात अडथळा केल्याच्या आरोपावरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. शनिवारी सह दिवानी कनिष्ट स्तर न्यायदंडाधिकारी एे. के. चौगुले यांच्या न्यायालयासमोर हजर केले असता डॉ. पोतदार याला ९ एप्रील पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीड