बीड : पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या स्वीय सहायक, वाहन चालक व इतर तिघांना कोरोनामुक्त झाल्याने रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. आता कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ७७ झाली आहे.
पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह त्यांचे स्वीय सहायक, वाहन चालक व इतर पाच जण मुंबईत कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. पैकी चालक व सहायकाला रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तसेच बीड शहरातील मसरत नगर भागातील तिघांना सुटी दिली आहे. दोन दिवसांत पाच जणांनी कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. त्यामुळे एकूण ९८ बाधितांपैकी ७७ जण कोरोनामुक्त झालेले आहेत. चौघांचा मृत्यू झाला आहे.
पालकमंत्र्यांनाही दोन दिवसात सुटीपालकमंत्री धनंजय मुंडे यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. त्यामुळे त्यांना येत्या दोन दिवसात रुग्णालयातून सुटी दिली जाणार असल्याचे आरोग्य विभागातील सूत्रांनी सांगितले. त्यांच्यावर सध्या मुंबईत उपचार सुरू आहेत.