शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात जोरदार संघर्ष, ७ दिवसांत १०० मृत्यू; कुर्रम जिल्ह्यात हिंसाचार पेटला
2
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती, मात्र समर्थकांना धक्कातंत्राची भीती
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
4
जम्मू-काश्मिरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांचा खात्मा होणार; NSG कमांडो कायमस्वरूपी तैनात करण्यास गृह मंत्रालयाची मंजुरी
5
देशातील नंबर १ रेस्तराँ कोणतं? Anand  Mahindra यांचीही आहे गुंतवणूक; या यादीत घातलाय धुमाकूळ
6
शेअर बाजारातून चांगला रिटर्न मिळवण्याच्या मोहात गमावले ११ कोटी; अधिकाऱ्यासोबत काय घडले?
7
VI नंबर १, सन्मान कॅपिटल २, इंडियन ऑईल ३... ही अशी कोणती लिस्ट, ज्यात कोणालाही नकोय नाव?
8
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
9
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
10
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
11
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
12
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
13
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
14
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
15
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
16
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
17
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
18
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
19
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर स्वबळाची भाषा सुरू; मविआ फुटीच्या उंबरठ्यावर?
20
महापालिका निवडणुकीत पक्षाचे अस्तित्व टिकवण्याचे उद्धव ठाकरेंसमोर कडवे आव्हान

CoronaVirus : परभणीतील कोरोना पॉझिटिव्ह तरुण माजलगावातून गेल्याची अफवा; नागरिक,प्रशासनाची उडाली धांदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 5:30 PM

प्रशासनाच्या चौकशीतून यातील खोडसाळपणा बाहेर आला असून ही केवळ अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

ठळक मुद्देपरभणी मनपा अधिकाऱ्यांचा व्हिडीओ व्हायरलव्हिडीओतील अर्धवट माहितीच्या आधारे खोडसाळपणे अफवा पसरवली

-  पुरूषोत्तम करवामाजलगाव : परभणी जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णाच्या नातेवाईकांची परभणी मनपा कडुन चौकशी होत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यातील नामसाधर्म्य व अर्धवट माहितीचा आधार घेत हा व्हिडीओ शहराच्या जवळील चिंचगव्हाण येथील असून तो पॉझिटिव्ह रुग्ण येथे येऊन गेल्याची अफवा पसरल्याने माजलगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली. यामुळे शुक्रवारी दुपारपासुन नागरिक  आणि प्रशासनाची चांगलीच धांदल उडाली. प्रशासनाच्या चौकशीतून यातील खोडसाळपणा बाहेर आला असून ही केवळ अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे.      पुण्याहून आलेला परभणी येथील कोरोना पॉझिटिव्ह माजलगाव-पाथरी मार्गे परभणीला गेला. जाताना तो माजलगावला मुक्कामी थांबला होता. याप्रकरणी शहरालगतच्या चिंचगव्हाण या पुनर्वसीत भागात चौकशी करण्यात आली अशी अफवा एका व्हिडीओसह शुक्रवारी दुपारपासून पसरल्याने एकच खळबळ उडाली.

ही अफवा लागलीच शहरभर पसरल्याने पत्रकार व प्रशासन यांना फोनकरून नागरिकांनी विचारणा सुरू झाली. लगोलग आरोग्य, महसूल व पोलीस प्रशासनाचा ताफा चिंचगव्हाणमध्ये दाखल झाला. व्हिडीओतील ठिकाण आणि व्यक्तींचा शोध घेण्यात आला मात्र यात कसलेच तथ्य नसल्याचे आढळून आले नाही. यामुळे शासकीय यंत्रणेसह नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

ही आहे व्हायरल व्हिडीओची सत्यताया अफवांच्या मुळाशी जाण्याचा  प्रयत्न केला असता परभणी मनपा पदाधिकारी कडून वस्तुनिष्ठ माहिती न देता व्हायरल करण्यात आलेला व्हिडीओ मुळाशी असल्याचे दिसून आले. परभणी येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यानंतर तो रुग्ण परभणी एमआयडीसी च्या मागील बाजूस असलेल्या त्याच्या मेव्हण्याकडे मुक्कामला असल्याची मनपा प्रशासनास माहीती मिळाली. यावरून मनपाची टीम त्या ठिकाणी जाऊन संबंधीत तरुणाची चौकशी करत असल्याचे या व्हिडिओत स्पष्ट दिसते. व्हिडिओच्या शेवटी मनपातील पदाधिकारी लोकांना आवाहन करत असल्याचे चित्रीकरण आहे. मात्र व्हायरल झालेल्या या व्हिडीओत कोठेही परभणी असा उल्लेख नाही. याचाच फायदा उचलत हा व्हिडीओ माजलगाव शहरापासून 1 कि.मी. अंतरावर असलेल्या पुनर्वसित चिंचगव्हाण येथील असून येथील एका व्यक्तीकडे तो रूग्ण येवुन गेला होता अशी अफवा पसरली.

पोलीस यंत्रणा दक्षआरोग्य प्रशासनाच्या मदतीने चिंचगव्हाणला भेटून पूर्ण चौकशी केली असता परभणीचा रुग्ण माजलगाव मध्ये थांबल्याची कोणती ही माहिती मिळाली नाही. ती केवळ एक अफवा होती तरीही पोलीस प्रशासन व आरोग्य प्रशासन याबाबत पूर्ण काळजी घेत आहे, असे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश बुधवंत यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीडparabhaniपरभणी