शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
2
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
3
“नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
4
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
5
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
6
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
7
'लव्ह अँड वॉर'च्या सेटवरुन Photos लीक, रेट्रो लूकमध्ये दिसली आलिया तर रणबीरचा डॅशिंग अवतार
8
Baba Siddique : "मारेकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यासाठी मिळाले ५० हजार"; आरोपीने दिली महत्त्वाची माहिती
9
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
10
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान
11
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 
12
एकनाथ शिंदेंनंतर लगेचच भाजपही पत्रकार परिषद घेणार; काय घडतेय...
13
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
14
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
15
Defence Stock: डिफेन्स स्टॉक्स पुन्हा एकदा सुस्साट, एक्सपर्ट बुलिश; पाहा काय आहेत नवी टार्गेट प्राईज
16
सत्तेत असावे की, सत्तेबाहेर? बच्चू कडूंनी जनतेलाच विचारला सवाल
17
ICC Test Rankings: जसप्रीत बुमराह पुन्हा 'नंबर १'! यशस्वी जैस्वाल, विराट कोहलीचीही कसोटी यादीत मोठी झेप
18
शेजाऱ्याने मुलाला केलं किडनॅप, नंतर शोधण्याचं नाटक; खंडणी न मिळताच भयंकर कृत्य अन्...
19
विरोधकांना EVMवर संशय, कोर्टात जायची तयारी; भाजपा नेतृत्वाचे भाष्य, म्हणाले, “लोकसभेवेळी...”
20
भाजपच्या मंत्र्यानं अजान ऐकून थांबवलं भाषण; मंचावरूनच पठण केलं, ‘ला इलाहा इल्लल्लाह…’ 

coronavirus : सुरक्षिततेचा प्रश्न; कोरोनाबाधित कैद्यांवर कारागृहामध्येच उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2020 5:18 PM

एकाच रात्री ५९ कैदी पॉझिटिव्ह आल्याने कारागृह व पोलीस प्रशासनात खळबळ उडाली होती.

ठळक मुद्दे कैद्यांवर जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांकडून उपचार ५८ कैदी कारागृहात असून दोघांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बीड : जिल्हा कारागृहातील तब्बल ५९ कैदी एकाच दिवशी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. अगोदर दोन कैद्यांनी पलायन केल्याने आणि सुरक्षेअभावी या सर्वांवर जिल्हा कारागृहातच उपचार केले जात आहेत. या कैद्यांसह १२८ जणांचा अहवाल रविवारी रात्री उशिरा पॉझिटिव्ह आला आहे. आता एकूण रुग्णसंख्या ४ हजार ७७ झाली आहे.

जिल्हा कारागृहातील आठ कैद्यांना सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे होती. त्यामुळे त्यांची अँटिजन टेस्ट केली. यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर कारागृहातील सर्वच २३४ कैद्यांची टेस्ट केली. यात २२४ पुरूष व १० महिलां कैद्यांचा समावेश होता. यात तब्बल ५९ जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. या प्रकरणाने जिल्ह्यात खळबळ उडाली. एवढ्या मोठ्या प्रमाणात कैदी पॉझिटिव्ह आल्याने त्यांना ठेवायचे कोठे आणि उपचार करायचे कोठे? असा प्रश्न प्रशासन व आरोग्य विभागासमोर होता. अखेर सुरक्षाअभावी या सर्वांना कारागृहातच स्वतंत्र दोन बरॅक करून उपचार केले जात आहेत. रविवारचे ५९ व शनिवारचा एक अशा ६० पैकी ५८ कैदी कारागृहात असून दोघांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, कारागृहातील कैद्यांवर जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांकडून उपचार केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.

दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणीएकाच रात्री ५९ कैदी पॉझिटिव्ह आल्याने कारागृह व पोलीस प्रशासनात खळबळ उडाली होती. याची माहिती आरोग्य विभागाला देताच दोन वैद्यकीय अधिकारी व पथकामार्फत त्यांची रात्रीच जाऊन तपासणी करण्यात आली. त्यांना औषधोपचार देण्यात आले.

औषधोपचार दिले जात आहेतकारागृहातील २३४ कैद्यांची तपासणी केली होती. पैकी ५९ पॉझिटिव्ह आले. याची माहिती जिल्हाधिकारी व आरोग्य विभागाला देण्यात आली. लक्षणे नसल्याने त्यांच्या सूचनेनुसार या सर्वांना कारागृहातच ठेवून उपचार केले जात आहेत. त्यांची योग्य ती काळजी घेऊन औषधोपचार दिले जात आहेत.- एम.एस.पवार, अधीक्षक, जिल्हा कारागृह बीड

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीड