बीड : अंबाजोगाई येथील वृद्धत्व आरोग्य व मानसिक आजार केंद्र आणि स्त्री रुग्णालयात नियुक्ती असलेल्या ३४ डॉक्टर, परिसेविकांना वर्षभरापासून वेतन मिळालेले नाही. त्यांची सध्या उपासमार होत आहे. एकीकडे कोवीडसारख्या संसर्गावर उपचार करताना स्वत:चा जीव धोक्यात घातला जात आहे, तर दुसऱ्या बाजुला आरोग्य विभागाकडून त्यांची वेतन रखडून उपासमार केली जात आहे. या ३४ डॉक्टर, कर्मचाऱ्यांना सध्या प्रतिनियुक्तीवर जिल्हाभरात पाठविल्याचे समोर आले आहे.अंबाजोगाई येथे वृध्द व मानसिक आजार असलेल्या रुग्णांसाठी स्वतंत्र असे रुग्णालय स्थापन केले. सुसज्ज इमारत व अधिकारी - कर्मचाºयांची नियुक्तीही केली. जुलै २०१९ साली वैद्यकीय अधिकारी, परिसेविका यांची नियुक्ती केली. परंतु हे रुग्णालय कार्यान्वित नसल्याने या डॉक्टर, परिसेविकांना इतर रुग्णालयात प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आले. त्यांचे काम नियमित सुरू असले तरी नियुक्ती झाल्यापासून त्यांना एकदाही वेतन मिळाले नसल्याचे समोर आले आहे.याबाबत त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक, उपसंचालक, आरोग्य मंत्री यांची दार ठोठावली, परंतु, अद्यापही न्याय मिळालेला नाही. आता त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे कैफियत मांडली आहे. परंतु त्यांच्याकडूनही अद्याप यावर कसलीच कारवाई झाली नसल्याचे दिसत आहे. याबाबत या कर्मचाºयांनी आता उपोषणास बसण्याचा इशाराही दिल्याचे सूत्रांकडून समजते. याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदनही दिले आहे.कोरोनाविरुद्धच्या लढ्यातही सहभागअंबाजोगाईच्या रुग्णालयात नियुक्ती असतानाही येथील सर्व नियूक्त डॉक्टर, कर्मचाºयांकडून जिल्ह्यातील इतर रुग्णालयातील कामे करून घेतली जात आहेत.त्यांना कोरोना वॉर्डमध्येही ड्यूटी लावली जात आहे. या लढ्यातही त्यांनी सहभाग नोंदविण्यासह जीव धोक्यात घालून प्रामाणिक कर्तव्य बजावले.वेतन मिळालेले नसतानाही उसनवारी करून ते आपले कुटूंब चालवित असल्याचे कर्मचाºयांकडून सांगण्यात आले.उपसंचालकांकडूनपुन्हा एकदा आश्वासनलातूर मंडळाचे उपसंचालक डॉ.एकनाथ माले यांना यापूर्वी संपर्क साधला असता, हे वेगळा हेडखाली असल्याचे सांगितले होते.लवकरच वेतन अदा करण्याचे आश्वासन त्यांनी एप्रिल महिन्यात दिले होते.सोमवारी पुन्हा त्यांनी आठवडाभरात वेतन अदा करण्याचे अश्वासन दिले आहे. कार्यवाही सुरू असल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.४आता प्रत्यक्षात वेतन कधी हातावर पडते याची कर्मचाºयांना प्रतीक्षा आहे.
coronavirus: कोरोना योद्ध्यांची उपासमार; वर्षभरापासून वेतन थकीत, उसनवारीवर घरखर्च आणि मुलांचे शिक्षण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2020 12:37 AM