बीड : दुबईहुन परतलेल्या महिलेला कोरोनाची लक्षणे जाणवू लागताच जिल्हा रुग्णलायातील गुरूवारी दुपारी आयसोलेशन वॉर्डमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. अहवाल निगेटिव्ह आल्याने तिला घरी पाठविण्यात आले आहे. असे असले तरी तिला होम क्वारंटाईन केले असून पुढील १४ दिवस तीला घराबाहेर न पडण्याच्या सुचना दिल्या आहेत.
बहिणीकडे गेलेली महिला बीडमध्ये परतली होती. पुण्याहून बीडला आल्यानंतर सकाळीच तिला सर्दी, ताप अशी लक्षणे जाणवू लागली. आरोग्य विभागाने तत्काळ या महिलेला जिल्हा रुग्णालयात आणून आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल केले. वैद्यकीय तज्ज्ञांच्या पथकाने तिची तपासणीही करून स्वॅप प्रयोगशाळेत पाठविले होते. याचा अहवाल शुक्रवारी प्राप्त झाला असून तो निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे आरोग्य विभागासह सामान्य नागरिकांनी सुटकेचा निश्वा:स सोडला होता.
दरम्यान, अहवाल प्राप्त झाल्यानंतर औषधोपचार देऊन सदरील महिलेला रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. पुढील १४ दिवस तिला होम क्वारंआईन करण्यात आले आहे. तिच्यासह नातेवाईकांना काळजी घेण्याबाबत सुचना केल्या आहेत. नागरिकांनीही घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार यांनी केले आहे.
जिल्हा रुगणालयातील आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल असलेल्या महिलेचा अहवाल निगेटिव्ह आला होता. तिला औषधोपचार देऊन रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. पुढील १४ दिवस तिला होम क्वारंटाईन केले आहे. तसेच काळजी घेण्याबाबत सदरील महिलेसह नातेवाईकांना सुचना केल्या आहेत. आमचा पाठपुरावाही सुरूच आहे.- डॉ.अशोक थोरात,जिल्हा शल्य चिकित्सक, बीड