सिरसाळा : माजलगाव तालुक्यातील कोथरुळ येथे चोरांनी धुमाकूळ घातला. एकाच रात्री तीन घरे फोडून लाखो रुपयांची नगद रोकडसह सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे. या प्रकारामुळे कोथरुळ व परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.शुक्रवार मध्यरात्री अंदाजानुसार १ ते पहाटे ३ वाजेच्या दरम्यान कोथरुळ येथील शिवाजी आश्रुबा चोपडे, कल्याण राधाकिसन मोहिते, महादेव रामराव गायकवाड यांच्या घरी चोरट्यांनी डल्ला मारला. उन्हाळा असल्याने या तिन्ही घरचे माणसे छतावरती झोपली होती. याचाच फायदा घेत चोरट्यांनी घरात प्रवेश केला. शिवाजी चोपडे यांच्या घरात लोखंडी गेटचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश करत रोख १ लक्ष १ हजारांसह ५ ग्रामच्या दोन अंगठ्या, ६ ग्रामचे झुंबर, ५ ग्रामचे सेवन पीस, ५ ग्राम सर्व मिळून २ तोळा १ ग्राम दागिने चोरी करु न दुसऱ्या दरवाज्यातून बाहेर पडले, जवळच असलेल्या कल्याण मोहिते यांच्या घरात समोरच्या दरवाज्याची आतील कडी लोखंडी सळीने तोडून आत प्रवेश करत रोख नगद ७१ हजार रुपयांसह १ तोळे सोन्याची दागिने चोरी करुन दुसºया दरवाजातून बाहेर पडले. या ठिकाणाहून जवळच असलेल्या महादेव गायकवाड यांच्या घरातही दरवाजाची आतील कडी लोखंडी सळीने तोडून आत प्रवेश करत गंठन ५ ग्राम, झुंबर ५ ग्राम, मनी ३ ग्राम दागिन्यासह रोख १ हजार रु पये ऐवज लाबंवला. तिन्ही ठिकाणचा रोख व दागिने मिळून ३ लक्ष ९५ हजार रुपयांवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. घटना घडल्यापासून काही वेळातच हा प्रकार घर मालकांच्या निदर्शनास आला. चर्चा गावभर वाºयासारखी बातमी पसरली. सकाळी सिरसाळा ठाण्याचे पोउपनि मेंडके, बेद्रे, एएसआय गडदे, पोकॉ. घोसले यांनी भेट देऊन पाहणी व पंचनामा केला. वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवत पुढील कार्यवाही केली. यातील शिवाजी आश्रूबा चोपडे यांच्या फिर्यादीवरुन सिरसाळा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोथरुळमध्ये एकाच रात्री ३ घरे फोडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2019 12:00 AM
माजलगाव तालुक्यातील कोथरुळ येथे चोरांनी धुमाकूळ घातला. एकाच रात्री तीन घरे फोडून लाखो रुपयांची नगद रोकडसह सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे.
ठळक मुद्देचोरांचा धुमाकूळ : लाखो रुपयांची नगद, रोकडसह सोने लंपास, पोलिसांपुढे आव्हान