शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
2
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
3
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
4
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
5
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
7
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
8
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
9
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
11
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
12
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
13
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
14
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
15
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
16
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
17
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
18
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
19
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?

सर्व साधारण सभेत बोलू दिले नाही म्हणून नगरसेवकाने अंगावर ओतले रॉकेल

By admin | Published: August 05, 2016 6:45 PM

येथील नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत विरोधी बाकावरील नगरसेवकाने अंगावर रॉकेल ओतून घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी घडली

ऑनलाइन लोकमतबीड, दि. ५ : येथील नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत विरोधी बाकावरील नगरसेवकाने अंगावर रॉकेल ओतून घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी घडली. सर्वसाधारण सभा सुरू असताना बोलू दिले नाही म्हणून हा प्रकार केल्याचे नगरसेवक खुर्शीद आलम यांनी सांगितले.

बीड नगरपालिकेत सहा महिन्यांपूर्वी सत्ताधारी पक्षातील पाच ते सहा नगरसेवकांनी बंडखोरी केली आहे. यामुळे पहिल्यांदाच बीड पालिकेची सर्वसाधारण सभा वादग्रस्तही झाली. शुक्रवारी ठरल्याप्रमाणे सभेला सुरुवात झाली. बंडखोरी केलेल्या नगरसेवकांनी शहरातील समस्येवर सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्यास सुरुवात करताच एकच गोंधळ उडाला.

नगराध्यक्षा रत्नमाला दुधाळ मात्र या गदारोळात शांत होत्या. सत्ताधारी पक्षातील नगरसेवक व विरोधी बाकांवरील नगरसेवक यांच्यात वादविवाद सुरू झाले. दरम्यानच, खुर्शीद आलम यांनी आपल्याला बैठकीत बोलू दिले जात नाही म्हणून अंगावर रॉकेल ओतून घेतले. या घटनेमुळे गोंधळात अधिकच भर पडली. पोलिसांनी खुर्शीद यांना ताब्यात घेऊन जिल्हा रुग्णालयात नेले. 

सभागृहात रॉकेल आले कोठून?एरवी सर्वसामान्यांना रॉकेल मिळत नसताना बीड पालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या सभागृहात रॉकेलची कॅन आली कोठून, हा प्रश्न पोलिसांसह सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. या घटनेनंतर पोलीस उपनिरीक्षक गणेश गावडे, शहर ठाण्याचे निरीक्षक एस.बी. पौळ, सहायक निरीक्षक यशवंत बारवकर, फौजदार कैलास डेरे यांनी घटनास्थळी भेट दिली.