बीड : शहरातील नगररोडलगत असलेल्या परिसरात एका किरायाच्या घरात कुंटनाखाना चालवला जात होता. याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागास मिळाली होती. त्यानुसार कारवाई करत मंगळवारी अंटीसह एकास अटक केली होती. त्यांना बुधवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनवाली आहे.नगररोड परिसरात एका पोलीस कर्मचाºयाचे घर किरायाणे घेऊन हा कुंटणखाना चालविला जात होता. याप्रकरणी अर्चना जगदीश जायभाये (रा. खंडाळा ता.बीड) आणि दलाल सिद्धार्थ ढवळे (रा.माळीवेस) यांना अटक केली होती. तसेच एका पीडितेची सुटका देखील करण्यात आली होती. याप्रकरणी पोउपनि राणी सानप यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. बुधवारी अंटी अर्जना जायभाये व सिद्धार्थ ढवळे यांना शिवाजीनगर पोलिसांनी न्यायालयात हजर केले. यावेळी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान पीडितेच्या नातेवाईकांशी संकर्प करुन तिला त्यांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती पोनि शिवलाल पुरभे यांनी दिली.
कुंटणखाना चालवणाऱ्या दोघांना न्यायालयीन कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2019 12:05 AM
शहरातील नगररोडलगत असलेल्या परिसरात एका किरायाच्या घरात कुंटनाखाना चालवला जात होता. याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागास मिळाली होती. त्यानुसार कारवाई करत मंगळवारी अंटीसह एकास अटक केली होती. त्यांना बुधवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनवाली आहे.
ठळक मुद्देपीडितेला दिले नातेवाईकांच्या ताब्यात