सेंटर
शिरुर कासार : तालुक्यात कोरोना रुग्ण संख्या घटल्यामुळे जवळपास तीन महिण्यापुर्वी येथील केअर सेंटर बंद केले होते ,परंतु, आता पुन्हा कोरोना रुग्णात वाढ होत असल्याने त्यांची गैरसोय टाळण्यासाठी शिरुर येथील शासकीय मुलींच्या निवासी शाळेत जुन्याच जागी हे सेंटर सुरु केले असल्याची माहिती तहशिलदार श्रीराम बेंडे यांनी दिली.
यावेळी त्यांचे समवेत तालुका आरोग्य अधिकारी डॉ अशोक गवळी, नायब तहसिलदार बाळू खेडकर, डॉ. शहाणे होते, त्यांनी सोमवारी सेंटरची पहाणी करुन रुग्णांची कुठलीही गैरसोय होणार नाही, याबाबत खातरजमा केली.
मागील पर्वात कोरोना रुग्ण संख्या कमालीची वाढली होती. हे सेंटर क्षमतेप्रमाणे भरल्यानंतर काही रुग्णांना इतरत्र सुध्दा हलविण्यात येत होते. मात्र नंतर रुग्ण संख्या घटत गेली असल्याने हे सेंटर बंद केले होते. पुन्हा आता नव्याने रुग्ण संखेत वाढ होऊ लागली. तालुक्यातील व तालुक्याच्या जवळील रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी पुन्हा बंद ठेवलेले सेंटर सुरु करण्यात आले आहे .यामुळे पाॅजिटिव्ह निघालेले परंतु, त्यांना फारसा त्रास किंवा ऑक्सिजन देण्याची गरज नसलेल्या रुग्णांना याठिकाणी ठेवण्यात येणार आहे. त्यांचेवर पुर्वीप्रमाणेच उपचार केला जाणार आहे. या कामी सेंटरमध्ये रुग्णांना निवास, नाष्टा भोजन आदी सुविधा मिळणार असुन दुरवर जाण्याची गरज भासणार नाही . कोवीडबाधित रुग्णांना सर्वतोपरी उपचार व सुविधा या कामी प्रशासन लक्ष देणार असल्याचे श्रीराम बेंडे यांनी सांगितले. सेंटरमधील बाधित रुग्णांच्या देखभालीसाठी नोडल ऑफिसर म्हणून डॉ .संतोष शहाणे यांचेवर जबाबदारी दिली असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ अशोक गवळी यांनी सांगितले .