पुरुषोत्तम करवा
माजलगाव : कोरोना पार्श्वभूमीवर रुग्णांची संख्या वाढत असल्याने ऐनवेळी रुग्णसंख्या वाढली तर आणीबाणीचा प्रसंग उद्भवू नये, यासाठी पूर्वतयारी म्हणून शासनाच्या वतीने १०० ऑक्सिजन बेडची व्यवस्था करण्यात येत आहे. त्यामुळे गरजू व गरीब रुग्णांना मोठा फायदा होणार आहे. या पार्श्वभूमीवर मागील २ दिवसांत तहसीलकडून विविध ठिकाणांवरून १९ ऑक्सिजन सिलिंडर ताब्यात घेण्यात आल्या आहेत.
माजलगाव तालुक्यात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. शासनाने परवानगी दिलेल्या देशपांडे हॉस्पिटल व यशवंत हॉस्पिटलच्या कोविड हॉस्पिटलमध्येदेखील रुग्ण संख्या प्रचंड वाढली असून इतर जिल्ह्यांतील रुग्णदेखील उपचारासाठी येथे दाखल होत आहेत. येथील शासकीय कोविड सेंटरमध्ये आतापर्यंत ऑक्सिजनची व्यवस्था करण्यात आली नव्हती. म्हणून, आणखी कोविड सेंटरला मान्यता देण्यात येत आहे.
मागील काही दिवसांत तालुक्यात दररोज ६०-७० रुग्णसंख्या येत आहे. या पार्श्वभूमीवर शासनाच्या वतीने १०० ऑक्सिजन बेडची व्यवस्था करण्यात येत आहे. ग्रामीण रुग्णालय व मुलींचे वसतिगृह या दोन ठिकाणी युध्दपातळीवर तयारी करण्यात येत आहे. यासाठी तहसीलदार वैशाली पाटील यांनी एक पथक नियुक्त केले होते. या पथकाने विविध खाजगी ठिकाणावरून १९ ऑक्सिजन सिलिंडर ताब्यात घेतले आहेत.
कारखाना, व्यक्ती, संस्थेचे सिलिंडर
विविध खासगी संस्था व व्यक्ती यांच्याकडून सिलिंडर घेतले गेले. त्यात छत्रपती कारखाना- ३ ,जय महेश कारखाना-५ ,तर दिंद्रुड , तालखेड येथील खाजगी दुकानदारांकडून मिळून १९ सिलिंडर ताब्यात घेतले असल्याचे नायब तहसीलदार अशोक भंडारे यांनी सांगितले.
पूर्वनियोजन सुरू आहे
तहसीलदार वैशाली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली १०० बेडची तयारी करून ठेवत आहोत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे
--डॉ.मधुकर घुबडे, तालुका आरोग्य अधिकारी.
जय महेश ५० ऑक्सिजन सिलिंडर देणार
येथील जय महेश साखर कारखान्याने सध्या असलेले ५ सिलिंडर प्रशासनास दिले असून दोन दिवसांत ऑक्सिजनचे आणखी ५० कारखाना देणार आहे.
--- गिरीश लोखंडे , उपाध्यक्ष जयमहेश कारखाना.
===Photopath===
170421\purusttam karva_img-20210417-wa0030_14.jpg