अंबाजोगाई :
डॉक्टर हा समाजात महत्वपूर्ण घटक असून, जो रुग्णांना सेवा देताना सेवाभावीवृत्ती आणि निष्ठेने आदर्श कार्य करतो, त्याच डॉक्टरांची वेगळी ओळख निर्माण होते, असे मत स्वाराती शासकीय रुग्णालयाच्या बधिरीकरणशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. सतीश देशपांडे यांनी व्यक्त केले. बधिरीकरणशास्त्र विभागाच्या वतीने सेवानिवृत्ती निमित्त आयोजित सेवा गौरव सोहळ्यात ते बोलत होते. सत्कारानंतर मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले, स्वामी रामानंदतीर्थ शासकीय रुग्णालयास पूर्वीपासूनच तज्ज्ञ डॉक्टरांचा वारसा असून, त्यांच्या रुग्णसेवेच्या नावावरच रुग्णालय ओळखले जाते. पुढेही याच पद्धतीने नवोदित डॉक्टरांनी गुणवत्ता सिध्द करून व आदर्श पध्दतीची रुग्णसेवा देऊन रुग्णालयाचा दर्जा उंचवावा, असेही ते म्हणाले.
डॉ. देशपांडे यांनी रुग्णसेवेसोबतच बधिरीकरण शास्त्र विषयाच्या अनुषंगाने विविध परिषदा घडवून आणल्या. याच महाविद्यालयात शिक्षण घेऊन येथेच सेवा करून सेवानिवृत्ती स्वीकारणारे डॉ. देशपांडे हे भाग्यवानच आहेत.
समाजात चांगला डॉक्टर निर्माण होण्याच्या उद्देशाने त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यांचे अनेक विद्यार्थी विविध रुग्णालयात विविध पदांवर कार्यरत आहेत. बधिरीकरणशास्त्र विषयाची अनेक पुस्तके प्रकाशित केली. राष्ट्रीय स्तरावर शेकडो विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
डॉ. देशपांडे यांचा सपत्नीक गौरव करण्यात आला.
यावेळी डॉ. अभिमन्यू तरकसे, डॉ. प्रशांत देशपांडे, डॉ. गणेश निकम, डॉ. संतोष गिते, डॉ. राहुल कोरे, डॉ. देवानंद पवार, डॉ. प्रसाद सुळे, डॉ. गणेश खांडेकर, डॉ. पवन राठोड, डॉ. मन्मथ देलमदे, डॉ. चंद्रकांत क्षीरसागर, माजी नगराध्यक्ष महादु मस्के, डॉ. अब्दैत देशपांडे, राहुल देशपांडे, डॉ. अपर्णा कुलकर्णी, डॉ. वैशाली क्षीरसागर, डॉ. राजश्री डावळे, डॉ. अनुराधा यादव, डॉ. वृषाली राजगिरे, डॉ. अर्चना देशपांडे, डॉ. अपूर्वा देशपांडे, कल्याणी देशपांडे आदींसह परिचारिका व इतर अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
===Photopath===
030321\03bed_15_03032021_14.jpg