बीड : ‘पोलीस रेजिंग डे’च्या निमित्ताने बीड जिल्हा पोलीस दलाने ‘क्रिकेट फॉर पिस एक सामाजिक बांधिलकी’ यासाठी पुढाकार घेतला आहे. नवीन वर्षाच्या सुरूवातीला म्हणजेच सोमवारी या स्पर्धा सुरू होणार असून आठवडाभर त्या चालतील. यामध्ये तब्बल ३५ संघ सहभागी झाले असून याची तयारीही अंतीम टप्प्यात आली आहे. तसेच या स्पर्धेतून पोलीस-नागरिकांचा सुसंवाद वाढण्याविण्याही उद्देश आहे.
मागील वर्षापासून नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच बीड जिल्हा पोलीस दलालकडून नागरिक व पोलिसांचा संवाद वाढावा, त्यांच्यात स्नेह निर्माण व्हावा, या उद्देशाने क्रिकेट स्पर्धा घेण्याचे नियोजन केले. गतवर्षी दिवस-रात्र सामने खेळविण्यात आले होते. यावर्षी जिल्हा क्रीडा संकुल व पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर सर्व सामने दिवसा खेळविले जाणार आहेत. २८ पोलीस ठाण्याचे २८ संघ, शहर वाहतूक शाखा, पत्रकार, वकिल, महसूल, कृषी, आरटीओ, पोलीस बॉईज अशा ३५ संघांचा यामध्ये सहभाग असणार आहे.
१ जानेवारी रोजी सकाळी ८.४५ वा. पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांच्या हस्ते पोलीस मुख्यालयावर या स्पर्धेचे उद्घाटन होईल. तर ५ जानेवारी रोजी सायं. ६ वा. या स्पर्धेचा समारोप होईल. समारोपाला पोलीस महानिरीक्षक मिलींद भारंबे यांची प्रमुख उपस्थिती राहील. पोलीस अधीक्षक जी.श्रीधरसह अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, अजित बोºहाडे, उपअधीक्षक सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा होत आहेत. या खेळाचा आनंद घेण्याबरोबरच खेळाडूंचा उत्साह वाढविण्यासाठी खेळाडू, क्रिडापेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन संयोजन समितीचे प्रमुख प्रा.प्रशांत जोशी, पोउपनि आर.टी.आमटे, कल्याण औटे, लक्ष्मण जायभाये, वसुदेव मिसाळ, शेख बाबर, अमोल ससाने, मनोज जोगदंड, बाबा निसरगंध आदींनी केले आहे.
बक्षिसांचा होणार वर्षावस्पर्धेत सहभागी होणार्यांसह विजेत्यांसाठी बक्षिसे ठेवली आहेत. यामध्ये प्रथम क्रमांकासाठी १५ हजार रूपये रोख, चषक व उपविजेत्यास १० हजार रूपये रोख व चषक देण्यात येणार आहे. तसेच उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, यष्टीरकक्ष, क्षेत्ररक्षकसह मालिकाविरासही बक्षिसे दिली जाणार आहेत.