शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे चेहऱ्याने जितके भोळे, तितकेच प्रचंड लबाड; रामदास कदमांचा हल्लाबोल
2
जागा वाटपावरून महायुतीत धुसफूस, नेत्यांच्या आदेशाचे उल्लंघन; नेमकं काय चाललंय?
3
Vande Bharat : दे दणादण! वंदे भारत ट्रेन चालवण्यासाठी लोको पायलट भिडले, तुफान राडा घालत गार्डवर हल्ला
4
Sanjay Roy : कोर्टात ढसाढसा रडला संजय रॉय; CBI चे वकील आले ४० मिनिटं उशिरा, न्यायाधीश झाले नाराज
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीचा सहवास आनंददायी ठरेल!
6
काँग्रेसची ठाकरे-पवारांच्या पक्षातील मतदारसंघातही चाचपणी; 'त्या' जागांवर दावा करणार
7
सर्वाधिक प्लास्टिकचे प्रदूषण करणारा देश, भारताच्या नावे विक्रम, पण अभिमान कसा बाळगणार?
8
अंतराळवीरांविनाच अखेर पृथ्वीवर परतले स्टारलायनर; सुनीता विलियम्स २०२५ मध्ये येणार
9
निवडणुकीनंतरच काश्मीरला राज्य दर्जा, ही निवडणूक ऐतिहासिक; अमित शाहांचं आश्वासन 
10
होय...आमच्या लष्कराचा कारागल युद्धात सहभाग होता; पाकिस्तानची प्रथमच कबुली
11
BREAKING : अन् काही मिनिटांत चांदीचं झालं सोनं; भालाफेकपटू नवदीप भारताचा नवा 'गोल्डन बॉय'
12
सरकार मोठा शॉक द्यायच्या तयारीत; क्रेडीट, डेबिट कार्डने पेमेंट केल्यास १८ टक्के जीएसटी
13
Paris Paralympics 2024: दृष्टीहीन Simran Sharma ची कमाल; भिंगरीसारखी धावली अन् पटकावलं मेडल
14
Puja Khedkar : पूजा खेडकरला आणखी दणका! केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय
15
पाकिस्तानातील पुढची पिढी अडाणीच राहणार; करोडो मुले शाळेत जातच नाहीत
16
बीएमडब्लूची टेस्ट ड्राईव्ह घ्यायला गेला अन् दोघांना उडवलं; मुलुंड अपघात प्रकरणी आरोपीला अटक
17
उत्तर कोरियात किम जोंग उनची सत्ता उलथविण्याची तयारी? मोठी शक्ती लागली कामाला
18
"फितूरीचे संस्कार दाखवले"; बार्शीहून ३०० गाड्या आल्या, जरांगेंचा आमदार राऊतांवर हल्लाबोल
19
करोडपती बनणे एकदम सोपे, एकदाच गुंतवा १ लाख रुपये; नंतर निवांत व्हा मालामाल; गणित समजून घ्या
20
कोलकात्यात रुग्णालयाचा नवा वाद; ३ तास रक्तस्त्राव, उपचाराअभावी मुलाचा मृत्यू

'राजस्थानी मल्टीस्टेटच्या चेअरमन, संचालक मंडळावर गुन्हे दाखल करा'; परळीत ठेवीदार आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2024 3:57 PM

लातूर आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मुख्य शाखा कार्यालय केले सिल

- संजय खाकरेपरळी: येथील राजस्थानी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या संचालक मंडळावर फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत या मागणीसाठी परळी येथील ठेवीदारांच्या शिष्टमंडळाने आज शहर पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकांची भेट घेतली. फसवणूक प्रकरणी 25 एप्रिल रोजी दाखल केलेल्या तक्रारी अर्जावरून संचालक मंडळावर कारवाई करावी असा आग्रह ठेवीदारांनी धरला आहे.

येथील राजस्थानी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन चंदुलाल बियाणी व संचालक मंडळांनी मुदतीनंतर ही ठेवीदारांचे पैसे परत केले नाहीत . गेल्या आठ महिन्यापासून राजस्थानी मल्टीस्टेटच्या परळीतील पाच शाखा बंद आहेत व चेअरमन चंदुलाल बियाणी व संचालक मंडळ गायब झाले आहे. त्यांचा मोबाईल ही बंद येत आहे.त्यामुळे ठेवीदारांनी येथील तहसील कार्यालयासमोर काही दिवसांपूर्वी उपोषण केले तसेच राजस्थानी मल्टीस्टेटच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली परंतु अद्यापही ठेवीदारांना पैसे मिळाले नसल्याने ठेविदार संतप्त झाले आहेत. 

शनिवारी राजस्थानी मल्टीस्टेटच्या संचालका विरोधात गुन्हे दाखल करावेत अशी मागणी परळीचे पोलीस निरीक्षकाकडे केली आहे. शुक्रवारी लातूर येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांनी राजस्थानी मल्टीस्टेटच्या मोंढा भागातील मुख्य शाखेला सिल ठोकले आहे. तसेच अरुणोदय मार्केटमधील शाखेला भेट दिली आहे अशी माहिती ठेवीदार सेवकराम जाधव यांनी शनिवारी दिली. लातूर पोलीस ठाण्यातही लातूर येथील एका ठेवीदारांनी संचालक मंडळाच्या विरोधात तक्रार दाखल केल्यावरून गुन्हे दाखल केले आहेत.  या गुन्ह्याच्या तपासासाठी लातूर आर्थिक शाखेचे पोलीस परळीत येऊन गेले. दरम्यान, आज सकाळी परळी येतील ठेवीदारांच्या शिष्टमंडळाने राजस्थानी मल्टीस्टेटच्या संचालक मंडळ विरुद्ध कारवाई करण्याच्या मागणीसाठी शहरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार ससाणे यांची भेट घेतली. 

तपास करू या प्रकरणाचा तपास करून संचालकाविरुद्ध पुढील कारवाई करण्यात येईल. - राजकुमार ससाणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, परळी 

अनेक ठेवीदार अडचणीत विश्वासाने पैसे गुंतवले असून मुदतीनंतरही पैसे परत मिळाले नाहीत. चेअरमन व संचालक भेटत नाहीत ते परळीतून निघून गेले आहेत. त्यामुळे दाद कुणाकडे मागावी असा प्रश्न पडला आहे. अनेक ठेवीदारांना विविध आर्थिक अडचणीला तोंड द्यावे लागत आहे.- रमेश कोमवार, ठेवीदार, परळी

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी