शहरं
Join us  
Trending Stories
1
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
2
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
3
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
5
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
7
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos
8
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
9
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
10
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
11
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
12
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
13
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
14
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
15
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
16
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
17
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
18
Maharashtra Election 2024 Live Updates: भिवंडीतील राज ठाकरेंची सभा झाली, पण भाषण झाले नाही
19
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
20
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई

पीक विमा भरताना बनवाबनवी सुरूच; केवळ तीन शेतकऱ्यांनी भरला २७९२ एकरचा विमा

By शिरीष शिंदे | Published: September 09, 2023 7:14 PM

बीड जिल्ह्यातील १८० अतिरिक्त विमा भरणारे रडारावर

बीड : जिल्ह्यातील पीक विमा घोटाळ्याची भारतीय कृषी विमा कंपनीने तपासणी सुरू केली आहे. यात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. अंबाजोगाई तालुक्यातील तीन शेतकऱ्यांनी अकृषिक जमिनीवर तब्बल २ हजार ७९२ एकरचा पीक विमा काढून क्षेत्र संरक्षित केले आहे. तर जिल्ह्यातील जवळपास १८० शेतकऱ्यांनी ६१ एकरपेक्षा जास्त क्षेत्रावर अधिक विमा भरला आहे.

जिल्ह्यातील काही भागात काही ठिकाणी अतिरिक्त पीक विमा भरण्याची बाब भारतीय कृषी विमा कंपनीने जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यानंतर रिमोट सेन्सिंगचा आधार घेत ग्राऊंड ट्रुथिंग करण्याचे आदेश दिले होते. १५ दिवसांच्या कालावधीत विमा कंपनीने केलेल्या तपासणीत अतिरिक्त पीक विमा भरून त्याचे पैसे लाटण्याच्या उद्देशाने विमा भरल्याचे दिसून येत आहे.

अतिरिक्त विम्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्याशेतकऱ्यांनी पीक विमा भरताना सातबाऱ्यावर पिकाच्या नमूद क्षेत्रापैकी अधिक क्षेत्र दाखवून विमा भरला आहे. कमी जमीन असताना जास्त जमीन व त्यावर लावण्यात आलेल्या पिकांचे क्षेत्र अधिक दाखवून पीक विमा भरण्यात आला आहे. अतिरिक्त विम्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरण्यात आल्या आहेत.

घोटाळ्यात सीएससी चालक सहभागी?पीक विमा घोटाळ्यात सीएससी चालक सहभागी असल्याचा संशय विमा अधिकाऱ्यांना आहे. परभणी जिल्ह्यातील एका सीएससी चालकाने वडवणी तालुक्यातील एका गावातील पीक विमा भरला आहे. विमा अर्ज भरल्यानंतर व्हेरिफिकेशनच्या वेळी नेट बंद करणे, वेगवेगळे प्रकार हॅकिंग करणे असे प्रयोग केले आहेत. पीक विमा अर्ज भरताना सातबाऱ्याची पडताळणी होते, शेवटी यादीमध्ये पंच होते. परंतु अयोग्य पद्धतीने भरलेले फॉर्म पूर्णत: भरले गेले नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

आतापर्यंत समोर आलेली प्रकरणेअंबाजोगाई तालुक्यातील एका गावातील तीन शेतकऱ्यांनी अकृषिक जमिनीवर अतिरिक्त विमा भरला आहे. एका शेतकऱ्याने सोयाबीनसाठी ४५८ हेक्टर, दुसऱ्या शेतकऱ्याने २१२ हेक्टर तर तिसऱ्या शेतकऱ्याने ४५९ हेक्टर असा एकूण १,१३० हेक्टर म्हणजेच २,७९२ एकरचा विमा काढला आहे. या तिन्ही शेतकऱ्यांनी सदरील पीक विमा रद्द करण्याची मागणी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे केली आहे. नजरचुकीने अकृषिक जमिनीवर विमा भरला असल्याचे त्यांनी अर्जात म्हटले आहे.

१८० शेतकऱ्यांनी भरला अतिरिक्त विमाजिल्ह्यातील जवळपास १८० शेतकऱ्यांनी २५ हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर विमा भरला आहे. त्यांच्याकडे एवढी शेती नसतानाही केवळ विमाच काढला नाही तर अतिरिक्त विमा भरून विम्याचा लाभ घेण्याची तयारी दर्शवली आहे. परंतु विमा कंपनीच्या वेळीच लक्षात आल्याने अतिरिक्त विमा घोटाळा प्रकरण समोर आले आहे.

पीक विमा रॅकेट सक्रियजिल्ह्यात पीक विम्याचा धंदा करण्याची माफियागिरी सुरू झाली असून हे माफिया सक्रिय झाले आहेत. मागच्या वर्षी पीक विमा कंपनीने अतिरिक्त पीक विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची यादी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांना दिली होती. संबंधित शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल होणार होते; परंतु विमा भरणारे शेतकरी असल्याच्या भावनेतून कारवाई झाली नव्हती; परंतु आता पुन्हा असेच प्रकरण समोर आले आहे. काही मोजक्या लोकांमुळे खऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय होतो. परिणामी पीक विमा कंपनी या घोटाळेबाज शेतकऱ्यांचा हवाला देत संबंधित मंडळातील सर्वच शेतकऱ्यांची नुकसानभरपाई रोखून धरते. अतिरिक्त पीक विमा भरणाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाBeedबीडFarmerशेतकरी