आष्टी : तालुक्यातील सावरगाव परिसरात ३१ ऑगस्ट रोजी दौलावडगाव महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाली. नद्या, नाले, तलाव रात्रीत ओव्हरफ्लो झाले. यात नदीकाठची शेती व पिके वाहून गेली. ११ घरांची पडझड झाली. यानंतर पुन्हा ४ व ५ सप्टेंबरच्या रात्री ढगफुटीसदृश पाऊस झाला. याय तालुक्यातील ३९ हजार ९६० हेक्टर क्षेत्रावरील कापूस, तूर, सोयाबीन, बाजरी, उडीद, कांदा पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांवर अस्मानी संकट ओढावले आहे.
माझा एक एकर उडीद पाण्यात असून, २ एकर कांदा पिवळा पडून सडण्याच्या मार्गावर आहे. ५ एकर तुरीमध्ये पाणी साठल्याने तीही पिवळी पडली आहे. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. प्रशासनाने सरसकट नुकसान पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी.
-भगवान सांगळे, शेतकरी, कऱ्हेवडगाव.
...
आष्टी तालुक्यात अतिवृष्टी झालेल्या भागात पंचनामे करण्याचे सुरू झालेले आहेत. अतिवृष्टीने ११० घरांची पडझड होऊन ११ जनावरे मयत झाले आहेत. तहसील कार्यालयात आढावा बैठक घेऊन या अतिवृष्टी भागाची पाहणी करून सरसकट पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.
-राजाभाऊ कदम, तहसीलदार, आष्टी.
..
080921\nitin kmble_img-20210831-wa0031_14.jpg~080921\img-20210908-wa0349_14.jpg