शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या पुढाऱ्यांचा राग माझ्यावर काढू नका"; अजित पवार ग्रामस्थांशी काय बोलले?
2
शरद पवार गटाचे उमेदवार समजीत घाटगे अंतरवालीत; मनोज जरांगेंची घेतली भेट, २ तास चर्चा
3
शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते काँग्रेसच्या प्रचारात; भाजपच्या बंडखोर महिला नेत्याचा मोठा दावा
4
महायुतीत बंडखोरांचा ३६ चा आकडा, त्यापैकी १९ भाजपाचे; बंड शमले नाहीतर युती-आघाडीला ५० जागांवर फटका
5
धनंजय मुंडे यांच्या २०१९ च्या शपथपत्रात तीन, तर २०२४ मध्ये पाच अपत्यांचा उल्लेख!
6
'इमर्जन्सी' ही प्रोपोगंडा फिल्म आहे का? श्रेयसने विचारलेला कंगनाला प्रश्न! अभिनेत्री म्हणाली-
7
"तू तो गया"! सिली पॉइंटवर Sarfaraz Khan चं रचिन विरुद्ध 'स्लेजिंग'; व्हिडिओ व्हायरल
8
८ नोव्हेंबरपासून 'या' कंपनीचा IPO खुला होणार; प्राईज बँड ₹२४, परदेशात आहेत कंपनीचे ग्राहक
9
“मनोज जरांगेंच्या रुपात देशाला आधुनिक गांधी, आंबेडकर, मौलाना आझाद मिळाले”; कुणी केले कौतुक?
10
कर्नाटक आर्थिक संकटात! जेवढी द्यायची ऐपत, तेवढीच आश्वासने द्या...; खर्गेंनी महाराष्ट्रावरून नेत्यांचे कान टोचले
11
नेत्रदिपक भरारी! मेडिकलचं करिअर सोडलं, काहीतरी मोठं करायचं ठरवलं; झाली अधिकारी
12
"मी ठासून सांगतोय माघार घेणार नाही"; वर्षा बंगल्यावरील भेटीनंतर सरवणकरांची स्पष्ट भूमिका
13
Maharashtra Election 2024: महाविकास आघाडीचा गेम बिघडवणार?; ११ बंडखोर कोण आहेत?
14
अमिषा पटेलनं का नाकारला होता शाहरुख खानचा 'चलते चलते'?, अभिनेत्री म्हणाली - "मला..."
15
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या अध्यक्षांचे निधन; मोदींकडून शोक व्यक्त
16
तरुणीचा व्हिडीओ कॉल उचलला आणि हनिट्रॅपमध्ये अडकले मंत्री, त्यानंतर घडलं असं काही...
17
Video - "RC, ड्रायव्हिंग लायसन्सची गरज नाही, पकडलं तर फक्त भाजपाची डायरी दाखवा, पोलीस..."
18
Gautam Adani News : अदानींनी नेमकं केलंय तरी काय? 'या' कंपनीच्या मागे का लागल्यात PNB, ICICI सारख्या बँका?
19
'सुंदर' चेंडू अन् 'कॉपी पेस्ट फॉर्म्युला'! टॉम लॅथमसह रचिन झाला क्लीन बोल्ड (VIDEO)
20
कार्तिक आर्यन-विद्या बालनचा 'भूल भूलैय्या ३' कसा आहे? पहिला Review आला समोर

बहुतांश शेतकऱ्यांची पिके धोक्यात, तत्काळ पंचनामे करून २५ टक्के अग्रिम रक्कम द्यावी: धनंजय मुंडे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2022 4:52 PM

हजारो हेक्टर शेती अक्षरशः सुकून गेली असून, माना टाकलेली, शेंगा वाळलेली सोयाबीन बघून वाईट वाटत आहे.

अंबाजोगाई -: बीड जिल्ह्यात मागील चार आठवड्यांपेक्षा अधिक काळात, पिके ऐन जोमात आल्यानंतर पावसाने मोठी उघडीप दिल्याने सोयाबीन, कापूस यासह बहुतांश पिके धोक्यात आली आहेत. हजारो हेक्टर शेती अक्षरशः सुकून गेली असून, माना टाकलेली, शेंगा वाळलेली सोयाबीन बघून वाईट वाटत आहे. ही परिस्थिती बीड जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी असून, प्रशासनाने तातडीने पंचनामे करून मागील वर्षी दिले त्याप्रमाणे धोक्यात आलेल्या सर्व पिकांना विमा संरक्षित रकमेच्या किमान २५ टक्के अग्रिम विमा मंजूर करून वितरित करावा, अशी मागणी माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी राज्य सरकार कडे केली आहे. 

धनंजय मुंडे यांनी आज अंबाजोगाई तालुक्यातील मुरकूटवाडी येथील सुकून गेलेल्या सोयाबीन पिकांची पाहणी केली. दोनही डोळ्यांनी अंध असलेल्या सुनील मुरकुटे यांच्या शेतातील सोयाबीन पाहणी करताना, सुकलेली सोयाबीन, ऐन बहरात वाळून गेलेल्या शेंगा अशी विदारक परिस्थिती पाहून चिंता व्यक्त केली. 

दोनही डोळ्यांनी अंध असलेल्या सुनील मुरकुटे यांच्या समोर संकटांचा डोंगर उभा असून, अशीच विदारक परिस्थिती जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांची झाली आहे. या शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज असून राज्य शासनाने प्रशासनाला व संबंधित विमा कंपन्यांना आदेशित करून तातडीने धोक्यात आलेल्या सर्व पिकांचे पंचनामे करून मागील वर्षी प्रमाणे किमान २५ टक्के अग्रिम रक्कम मंजूर करून तातडीने वितरित करण्यात यावी, अशी मागणी राज्य सरकार कडे केली आहे. तसेच याबाबत शासन स्तरावर पाठपुरावा करणार असल्याचेही धनंजय मुंडे म्हणाले.

यावेळी माजी आ. संजय दौंड, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड. राजेश्वर चव्हाण, परळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ऍड. गोविंद फड, राष्ट्रवादी काँग्रेसचे मतदारसंघ प्रमुख गोविंद देशमुख, शिवहार भताने गुरुजी, नागनाथ महाराज मुरकुटे, अय्युब भाई शेख, बबन मुंडे, सीताराम हाडबे, सायस मुरकुटे, चंद्रकांत गायकवाड, माऊली गायकवाड, राहुल गायकवाड, कैलास गायकवाड, बापू राऊत यांसह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती