गेवराई :
खरीप हंगामाच्या सुरुवातीला थोडाफार पाऊस पडल्याने वेळेवर पेरणी करण्यात आली. पेरणीनंतर पावसाने दडी मारली होती. यानंतर थोड्या प्रमाणात पाऊस झाला. यामुळे पिकांना जीवनदान मिळाले. परंतु गेल्या २० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिके करपून गेली आहे. यामुळे तालुक्यावर दुष्काळाचे सावट आहे.
विहिरींनी ही तळ गाठला आहे. असे चित्र राहिले तर पुढे पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सध्या ज्यांच्याकडे थोड्याफार प्रमाणत पाणी आहे ते शेतकरी स्प्रिंकलर, ठिबकने पाणी देत आहेत. पण अशा पाण्याने पिकावर रोगराई जास्त होत असल्याचे आढळून येत आहे. निम्मा पावसाळा संपला तरी मोठा पाऊस पडलेला नाही. सध्या कुठेच अजूनही दमदार पाऊस पडला नसल्याने नदीनाले, कोरडेठाक पडले आहेत. एकंदरीत दुष्काळाचे चिन्हे दिसत आहेत. यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे.
160821\16bed_1_16082021_14.jpg